अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जमानत.

Mahawani

 

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना बेल मिळाल्याच्या आनंद बल्लारपूरमध्ये पक्षातर्फे जल्लोष साजरा


महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ मे २०२४

बल्लारपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मा. अरविंद केजरीवाल (Hon. Arvind Kejriwal) यांना मद्य घोटाळ्याचे आरोप करून अटक करण्यात आले होते. परंतु आम आदमी पक्षाचे गड असलेल्या दिल्ली-पंजाब मध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी केजरीवाल यांची बेलवर सुटका झाल्याने आप मध्ये देशभरात ऊर्जा संचारल्याचे दिसून येत आहे. अशीच ऊर्जा बल्लारपूर शहरातील आम आदमी पक्षाला देखील मिळाल्याचे दिसून आले. 

        शहरातील बस स्थानक ते नगरपरिषद चौका पर्यंत पक्षातर्फे अतिषबाजीसोबत बॅन्ड बाजाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, सर्वाना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. अत्यंत उत्साहात कार्यकर्ते व पदाधिकारी केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष देतांना दिसले आणि शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार (Ravi Bhau Puppalwar) यांनी केजरीवालांची जमानत म्हणजे भा.ज.प च्या पतनाची सुरूवात आहे असे म्हटले. यावेळेस बल्लारपूर शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. (mahawani) (ballarpur) (aap)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top