शेतकऱ्यांची आपले संमतीपत्र व बँक खाते तपशील तहसील कार्यालयात सादर करावे : तहसिलदार राजुरा

 

२० मे २०२४ पर्यंत आपले संमतीपत्र व बँक खाते तपशील आपले तलाठी यांचेकडे सादर करावे


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ मे २०२४

राजुरा : सन २०२१ व सन २०२२ मध्ये राजुरा तालुक्यामधील विविध गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करून शासनाकडून अनुदान वाटपासाठी निधी प्राप्त झालेला असून त्यापैकी

    प्राप्त निधी - १२४०६६४३६/- शेतकरी संख्या - १३६६९, वाटप निधी - १०४०४०५४८/- शेतकरी संख्या - १०,७०७, शिल्लक निधी- २००२५८८८/- शेतकरी संख्या - २९६२ असून 

वरील प्रमाणे शेतकरी यांना निधी वाटप करणे शिल्लक आहे. तरी शिल्लक शेतकरी यांच्या गाव निहाय याद्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना प्रसिध्दीसाठी देण्यात आलेल्या आहेत. शिल्लक शेतकरी हे संयुक्त, सामाईक खाता प्रकरणातील असणारे किंवा गावामध्ये वास्तव्यास नसणारे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सर्वांना कळविण्यात येते की, २० मे २०२४ पर्यंत आपले संमतीपत्र व बँक खाते तपशील आपले तलाठी यांचेकडे सादर करावे अन्यथा सदर रक्कम शासनास परत करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही शेतकरी यांचे अनुदान मिळण्याबाबतचे दावे या कार्यालय स्तरावर स्विकारले जाणार नाहीत. त्यानंतर सर्वस्वी जबाबदारी संबंधित खातेदार शेतकरी यांची राहील. (Farmers should submit their consent letter and bank account details in the Tehsil Office Tehsildar Rajura)

तरी शिल्लक सर्व खातेदार शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, आपले संमतीपत्र व बँक खाते तपशील दिनांक २० मे २०२४ पर्यंत आपले तलाठी मार्फत तहसिल कार्यालयात सादर करावेत. (mahawani) (rajura)

To Top