लवकरच सुमित्रा नगर येथे होणार नियमित पाणी पुरवठा.


तांत्रिक अडचणी सोडविणे व गळती दुरुस्तीचे काम सुरु


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ मे २०२४

चंद्रपूर : अमृत पाणी पुरवठा योजना अंतर्गत सुमित्रा नगर येथे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मनपा पाणी पुरवठा विभागातर्फे पाहणी करण्यात आली असुन या कामात असलेल्या तांत्रिक अडचणी सोडविणे व गळती दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. साधारण १० दिवसांच्या कालावधीनंतर सुमित्रा नगर येथे नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. (Amrit Water Supply Scheme)

        चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेअंतर्गत एकुण १६ झोन तयार करण्यात आले असुन यातील झोन क्र.२ परीसरात सुमित्रानगर वस्ती येते. या वस्ती परीसरात अमृत अभियान अंतर्गत वितरण व्यवस्थेची पाईपलाईन टाकण्यात आलेली असुन नळ जोडणी सुद्धा देण्यात आली आहे. मात्र सदर परीसर हा या झोनचा शेवटचा भाग असल्याने नागरिकांना कमी दाबात पाणी पुरवठा होत असल्याचे चाचणी दरम्यान निदर्शनास आले. (Sumitra Nagar chandrapur)

        सदर भागात महानगरपालिकेची जुनी पाईपलाईन असल्याने नागरीकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने जुन्याच पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात आला होता.मात्र आता सुमित्रा नगर वस्तीतुन अमृत नळाद्वारे पाणी पुरवठा चालु करण्याचे काम सुरु झाले असुन सदर कामात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत तर काही ठिकाणी गळती असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.सदर काम पुर्ण करण्यास अंदाजे १० दिवसांचा कालावधी लागणार असुन त्यानंतरच सुमित्रा नगर वस्तीत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. (mahawani) (chandrapur mahanagar palika) 

To Top