ॲड. वामनराव चटप यांना साथ देऊन शेतकरी चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी शेतक-यांची.


जेष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१५ मे २०२४

राजुरा : शेतकरी हा अन्नदाता असुन सर्व भेद झुगारून फक्त शेतक-यांसाठी शरद जोशींनी आपले आयुष्य वेचले आणि शेतकरी ही एकमेव भुमिका शेतक-यांच्या मनात प्रज्वलित केली. या काळात अनेक शेतकरी नेते, सहकारी त्यांना सोडून गेले. मात्र ॲड.वामनराव चटप यांनी प्रलोभनाला बळी न पडता संपुर्ण जीवन शेतक-यांना समर्पित करीत निष्ठा आणि समर्पण वृत्तीने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहिले. म.गांधी, डाॅ.आंबेडकर या नेत्यांची खरी पारख देशातील जनतेने केली नाही. शरद जोशींनंतर त्यांचे विचार व शेतकरी चळवळीपुढील अनेक आव्हाने पेलून पुढे नेण्याची जबाबदारी सर्व शेतक-यांवर आली आहे. या वैचारिक भूमिका आणि शेतक-यांचे नेतृत्व अंत्यंत जबाबदारीने करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष करणा-या आणि अत्यंत सालस व सुस्वभावी असलेल्या वामनराव चटप या संसदपटू शेतकरी नेत्याच्या पाठीशी शेतक-यांनी भक्कमपणे उभे राहावे आणि त्यांच्यासोबत संघर्षाला साथ द्यावी,, असे आवाहन जेष्ठ साहित्यिक व माजी संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.

            राजुरा येथे १३ मे ला जेष्ठ शेतकरी नेते, माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात द्वादशीवार बोलत होते. व्यासपीठावर सत्कारमुर्ती ॲड.वामनराव चटप, सौ.वंदना चटप, दिनेश शर्मा, मधुसुदन हरणे, ॲड.वासुदेेव वासेकर, रेखा अपराजित, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, दिपक जयस्वाल, अरूण केदार, अशोक मत्ते, प्रा.जोत्स्ना मोहितकर, मुरलीधर देवाळकर, संदीप जैन, माणिक वानखेडे, निळकंठ कोरांगे, शालिक माऊलीकर, रमेश राजुरकर, मुकेश मासूरकर, ॲड.शरद कारेकर,रवि गोखरे, प्रा.सतिश मोहितकर, सुदर्शन दाचेवार यांचेसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

        यावेळी सुरेश द्वादशीवार यांनी देशातील सद्य परिस्थितीचा विस्तृत आढावा घेत राजकारणातील विविध समाजविरोधी बाबींचा खरपूस शब्दात समाचार घेतला. धर्मांधता ही राजकारणाची शत्रु असून यापासुन लोकांनी सजग होण्याची गरज आहे. सरकार अनेक अनाठायी खर्च करीत असून गरिबांसाठी काहीच ठोस करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एकीकडे गरीबांना पोट भरण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असतांना दुस-याबाजूला श्रीमंतांची चंगळ होतांना दिसत आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या याविषयी राजकारणी व मिडीया काही बोलत नाही मात्र अनाठायी गोष्टींची जाहिरात केली जाते. हे सर्व बदलण्यासाठी गरीबांच्या हाती राजकारण आलो पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. कोणतेही पद नसतांना एवढा मोठा लोकसंग्रह ही ॲड.वामनराव चटप यांच्या कार्याची पावती असून यानिमीत्त सुरेश द्वादशीवार यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात ॲड.वामनराव चटप यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शेतकरी व जनतेपुढे आ वासून उभ्या असलेल्या विविध प्रश्नांचा आढावा घेत या समस्यांच्या सोडवणूकीसाठी शेतकरी व नागरिकांनी संघटीत होण्याचे आवाहन केले. यावेळी

        ॲड. दिनेश शर्मा, ॲड.वासुदेव वासेकर यांची भाषणे झाली. पाहुण्यांचा परिचय अनिल बाळसराफ यांनी करून दिला. कार्यक्रमात ॲड.वामनराव चटप यांचा सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला. स्वागत गीत व शेतकरी गीत आरोही संगीत विद्यालयाच्या अल्का सदावर्ते व चमू ने सादर केले. संचालन केतन जुनघरे व आभारप्रदर्शन नुतेेश डाखरे यांनी केले. या सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येंत उपस्थित होते. (mahawani) (rajura) (wamanrao Chatap)

To Top