CMPL धोपटाला ओपन कास्ट माईन्स मेसबिल च्या नावाखाली करत आहे कामगारांची दुप्पट लूट.


जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे हे कामगारांच्या बाजूने आक्रमक भूमिकेत !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१८ मे २०२४

राजुरा/धोपटाला : CMPL धोपटाला ओपन कास्ट माईन्स मधील काही स्थानिक कामगार सोडले तर बहुतांश कामगारांची सहमती नसताना देखील ही कंपनी कामगारांना कॅम्प मध्ये राहून काम करण्यास भाग पाडत असते. कामगार रोजगार गमावून बेरोजगार होण्याच्या भीतीने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार करत हाती मिळालेल काम मजबूरने करत असल्याचा कंपनी फायदा घेत कंपनीने बळजबरीने लादलेल्या अटी नुसार नाईलाजास्तव कामगार हे कॅम्पमध्ये राहुन कंपनीच्या मेस कॅन्टीन मधूनचं जेवण करावे लागत असल्याने याच गोष्टीचा फायदा घेत कंपनी व्यवस्थापक हे निष्कृष्ट दर्जाचे जेवण कामगारांना देऊन कामगारांकडून वाजवी दर जास्तीत जास्त ३०००/- ते ३५००/- रुपये महिना कामगारांच्या पगारातून कपात करण्याऐवजी कामगारांकडून बळजबरीने ६०००/- ते ७०००/- रुपये महिना कपात करत असल्याचा प्रकार  समोर आला आहे. 

        ही कामगारांची आर्थिक पिळवणूक सदर कंपनी प्रशासन गेल्या अनेक वर्षापासून करत असल्याची बाब समोर येतात यासंदर्भात जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे (Mr. Suraj Thakre) यांनी कामगारांच्या तक्रारीची दखल घेत कंपनीत प्रशासनाला भ्रमणध्वनीद्वारे खडे बोल सुनावून मेस बिल वाजवी दरात घेण्यास सांगितले व या संदर्भात केंद्रीय श्रम उपायुक्त पत्रव्यवहार करत तक्रार करून कंपनी प्रशासनावर कार्यवाही करून कामगारांचे अतिरिक्त कपात केलेले पैसे कामगारांच्या खात्यावर टाकण्यास सांगितले. कामगारांची शारीरिक,  आर्थिक व मानसिक पिळवणूक हे जय भवानी कामगार संघटना कधी खपवून घेणार नाही असे सुरज ठाकरे यांनी कंपनी व्यवस्थापकाला सुनावले. 

        याशिवाय नुकताच केंद्र शासनाने ठरविलेल्या नवीन किमान वेतनानुसार पगार देण्याऐवजी कंपनी प्रशासन उलट दररोज प्रमाणे ४५ रुपये कामगारांना कमी देण्यात देत असल्याने कामगारांना त्यांच्या मेहनतीचे व त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळावे याकरिता सदर प्रश्न तात्काळ कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता जय भवानी कामगार संघटनेनी कंपनी व्यवस्थापकांना कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडून कामगारांच्या बाजूने न्याय देऊन दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यास संबंधित विभागात मागणी केली आहे. (mahawani) (rajura) (dhptala) (jay bhawani kamgar sanghatna)

To Top