निवडणुक संपताच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर पुन्हा अँक्शन मोडवर

 

जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या कारवाईत 41,27,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२७ एप्रिल २०२४

चंद्रपूर : मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दि. 23.04.2024 रोजी गोपनिय बातमीदारा कडुन पो.स्टे. भद्रावती हद्दीत मौजा घोडपेठ येथिल मुख्य चौकातील खर्रा व्यावसायिक महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू ची आपल्या घरात अवैधरित्या साठवणुक करुन विक्री करीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा घोडपेठ येथिल खर्रा व्यावसायिक नामे सुमेध उर्फ समिर देवगडे यांस ताब्यात घेवुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरी कि. अं. 47,000 रु. चा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाकु मिळुन आला. सदरचा गुन्हा पो.स्टे. भद्रावती येथे नोंद करुन मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पो.स्टे. भद्रावती यांचे ताब्यात देण्यात आले.

तसेच दि. 24.04.2024 रोजी पहाटे 4.00 वा. सुमारास गोपनिय बातमीदाराकडुन खबर मिळाली की, नागपुर - चंद्रपुर महामार्गाने दोन ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात अवैधरित्या जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करुन तेलंगाना राज्यात नेत आहे.सदर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा पडोली येथिल एमआयडिसी चौकात नाकाबंदी केली असता बातमीदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणे अशोक लेलँड कंपनिचे दोन ट्रक एम एच 34 एबी 9001 व एम एच 34 एबी 6202 संशयास्पद रित्या येतांना दिसुन आले नाकाबंदी दरम्यान सदर वाहनांना थांबण्याचा इशारा केला असता दोन्ही ट्रक नाकाबंदी मध्ये न थांबता भरधाव वेगाने घुग्घूस च्या दिशेने पळुन जात असताना सदर दोन्ही ट्रक चे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन मौजा चिंचाळा गावाजवळ थांबवुन वाहनांची पाहणी केली असता सदर दोन्ही ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त अवैधरित्या जनावरांना क्रूरतेने पाय, मान व तोंडाला दोरीने बांधुन, गाडीत कोंबुन चारा पाण्याची कशाचीच व्यवस्था न करता जनावरांना कत्तलीकरीता / कटाई करण्याकरिता तेलंगाणा येथे घेवुन जात असल्याचे दिसुन आले. सदर दोन्ही ट्रकमध्ये एकुण 53 नग गोवंश जनावरे कि. अं. 20,60,000/- रु., दोन ट्रक किं. 20,00,000/-रु. व दोन मोबाईल कि. 20,000/- असा एकुण 40,80,000/- रु. ( चाळीस लाख ऐंशी हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही ट्रक मधील इसम नामे 1) वसिम खान युनुस खान वय 19 वर्षे रा. आणि जि. यवतमाळ ह.मु. वार्ड नं. 4 गडचांदुर ता. कोरपना जि. चंद्रपुर 2) फारुख खान गफ्फार खान वय 25 वर्षे रा. आणि जि. यवतमाळ ह.मु. वार्ड नं. 4 गडचांदुर ता. कोरपना जि. चंद्रपुर यांचेवर कलम 429 भादवि, सहकलम 11 (1), (ड) प्रा. नि. वा. कायदा 1960, सहकलम 5 अ (1),5 ब,9,11 महा.प्रा.संरक्षण कायदा, सहकलम 83, 130/177, मोवाका अन्वये पो.स्टे. पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. पडोली यांचे ताब्यात देण्यात आले. (Hon. Superintendent of Police Mr. Mummaka Sudarshan)

उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली. (chandrapur) (lcb) (mahapolice) (mahawani)

To Top