अखेर वाळू माफियातून दोन वाळू तस्कर गंजा आळ.

 

विनायक आवरी, तलाठी कढोली साजा यांची मोठी कारवाई कढोलि (बू.) येथील वाळू माफियातील २ वाहन जप्त.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०२ मे २०२४

राजुरा/कढोली (बु.) : मागील काही काळापासून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून कढोली (बु.) - हडस्ती क्षेत्रातील वर्धा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून नदीच्या पात्राला अक्षरशा खिंडार पाडले आहे. या संदर्भातील बातम्या हि माध्यमात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या होत्या. परंतु वाळू माफिया वर याचे काही परिणाम दिसून येत नसून वाळू तस्कर त्याच जोमाने वाळू उपसा करत असूनही वाळू माफिया प्रशासनाच्या गराला लागत नसल्याने सर्वत्र रोषाचे वातावरण पसरले होते.

याचीच दाखल घेत आज सकाळी ०७:०० च्या सुमारास विनायक आवारी तलाठी साजा कढोली (बु.), (Vinayak Avari) निरंजन गोरे मंडळ अधिकारी (Niranjan Gore) यांनी आपल्या सहकाऱ्या समेत कढोली (बु.) येथे सापळा रचून (१) वाहन क्रमानं - MH 34 BV 6973, ट्रॉली क्र. MH 34 BF 8960 राजेश कमलाकर उरकुडे (Rajesh Kamlakar Urkude) रा. कढोली (बु.) (२) वाहन क्रमांक नसलेले ट्रॅक्टर व ट्रॉली दत्तात्रय धोंडूजी हिंगाने (Dattatraya Dhonduji Hingane) रा. कढोली (बु.) यांच्या मालकीचे असून यांना कोलगाव मार्गाने येत असतांना कढोली (बु.) येथील चौकातुन विना वाहतूक परवाना वाळू वाहून नेत असतांना जप्त करण्यात आले असून दोन्ही वाहन समोरील कार्यवाही करीता तहसील कार्यालय राजुरा येथे जमा करण्यात आले आहे. (Carrying sand without transport permit)

जप्तीने सदर क्षेत्रातील वाळू तस्कराचे चांगलेच धाबे दणाणले असून वाळू माफियातील काहींनी आपले वाहन डोळ्याआळ केले असून वरील प्रमाणे वाहन क्रमांक नसलेले ट्रॅक्टर व ट्रॉली अजूनही सदर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत असल्याचे स्थानिकातून बोलले जात आहे. (Finally action was taken against 2 sand smugglers) (mahawani) (rajura) (madholi BK) (Sand smuggler)

  • आज ज्या पद्धतीने दोन वाळू तस्करांना गंजा आळ केले तसेच बाकींनाही करा. - श्री. शैलेश चटके, सरपंच, कढोली (बु.)

To Top