लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका आठवडयात ३ सराईत गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई.


शरीरा व मालमत्ते विरूद्धचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्याची मा.पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेश 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२३ मार्च २०२४

चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झाला असुन मा. श्री. मुम्मका सुदर्शन (Hon. Mr. Mummaka Sudarshan), पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. रिना जनबंधू (Hon. Rina Janbandhu), अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदशीखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहिम हाती घेतली आहे.

        आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तोंडावर जिल्हात शांतता अबाधीत राखण्या करीता चंद्रपूर जिल्हयातील शरीरा विरूद्ध व मालमत्ते विरूद्धचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्या संबधाने मा.पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी आदेश पारीत करताच पो.स्टे. चंद्रपूर शहर येथील १) शुभम अमर समुद (Shubham Amar Samud)(२६) रा.पंचशील वार्ड, चंद्रपूर पो.स्टे. रामनगर येथील २) शारूख नुरखा पठाण (Sharukh Nurkha Pathan) (२९) रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ, चंद्रपूर ३) नैनेश उर्फ लाला नितीन शहा (Nainesh/ Lala Nitin Shah) (३१) रा.लुंबीनी नगर बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर यांना या आठवडयामध्ये तसेच पो.स्टे. वरोरा येथील 1) मोहन केशव कुचनकर (Mohan Keshav Kuchankar) (२५) रा.चिरघर लेआऊट वरोरा जि. चंद्रपूर यास मागील आठवडया मध्ये कलम ५६(१) (अ) (ब) म.पो.का. अन्वये चालु महिण्यात असे एकूण ४ इसमांना ६ महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.

        सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनात मा. नाओमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, मा. सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, श्री. महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोलाची कामगीरी बजावून आतापर्यंत नमुद इसमांना ६ महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे. (mahawani) (chandrapur) (mhpolice) (tadipar)

To Top