सत्ताधाऱ्यांची सुड घ्यायची आली वेळ योग्य मतदान करून करू यांचा खेळ.


घ्या सूड गेल्या ७५ वर्षाचा, घ्या सूड आपल्या क्रांतीकारांचां इतिहास दडपवून आमच्या डोक्यात डरपोकांचे, माफिवीरांचे विचार घालणाऱ्यांचा -संतोष कुळमेथे विदर्भ प्रमुख आदिवसी टायगर सेना


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२५ मार्च २०२४

राजुरा : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झालीत अजूनही आदिवासी समाजाचा विकास आज पावतो सत्ता भोगणाऱ्या पक्षांनी आदिवासी समाजाचा अशिक्षितेचा फायदा घेतला आहे. आदिवासी समाजाला २५ किलो अनाज व १ लाखाचे घरकुल ह्या व्यतिरिक्त काहीच दिले नाही. ह्यांची जाणिव सद्याच्या घडीला असलेल्या युवकांना चांगलीच समजून आलेली आहे. गेल्या काही काळात आदिवासीनी जे प्रश्न घेऊन आंदोलने केली त त्यातला एकही प्रश्न मार्गी लागलेला नसून सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय देखील विद्यमान सरकार मानायला तयार नाही. 

        मणिपूर असो, हसदेव असो, सुर्जागड असो वा गडचिरोली, छत्तीसगड, म.पी. मधील विविध समस्यावर कधीही सरकार तर्फे पाऊल उचलले गेले नाही. बळजबरी व बंदुकीच्या जोरावर आंदोलने मोडून काढली गेली. नक्सलवादी असल्याच्या नावाखाली ३ वर्षांच्या मुलीला गोळी घालून ठार केले हे सहन करण्या जोगी बाब नाही.

        जे लोक ह्यांचे ऐकणार नाही त्यांना जेल किंवा अन्य व्यतिरिक्त जागी अडकवून त्यांची पिळवणूक करतील. हे आताच असे आहे तर अजून सत्तेत आले तर विचार करा कुठ नेऊन ठेवतील आदिवासींना हे विचार करूनच धसका बसतो. आपल्याला आता मतदानाचा अधिकार बजावून कश्या प्रकारे ह्यांना वेळीच रोकता येईल याचे नियोजन आदिवासी समाजातील जाणकार व्यक्तीनि प्रत्येक बूथवर आपले चमू, आपली माणसे, आपल्या लोकांना सत्य परिस्थिती समजवून सांगत करायला हवी.

        घ्या सूड गेल्या ७५ वर्षाचा, घ्या सूड आपल्या क्रांतीकारांचां इतिहास दडपवून आमच्या डोक्यात डरपोकांचे माफिवीरांचे विचार घालणाऱ्यांचा, घ्या सूड तुम्हाला पेसा कायद्या पासून वंचित ठेवणाऱ्यांचा. ही संधी ५ वर्षात एकदाच येते आपण विजयी नाही झालो तरी बहहतर परंतु यांना यांची योग्य जागा व आपल्या मताची ताकद दाखवून द्या. मते मागायला आले तर सरळ प्रश्न विचारा गेल्या ५ वर्षात आमचे किती प्रश्न आपण भवनात मांडले तेव्हा कुठ यांना आमचे महत्व कढतील. 

आमच्या समाजाच्या व्यक्तींनी सुध्धा उमेदवारी अर्ज भरला असेल तर त्याचीहि योग्यता तपासा अनेकदा मतदान विभाजन करण्यासाठी सत्ताधारी पक्षा तर्फे भांडवल घेत आपला उमेदवारी अर्ज करतात. तरी आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या समाजबांधवाने सावध व्हावे. असे संतोष कुळमेथे आदिवासी टायगर सेना विदर्भ अध्यक्ष ह्यांनी आदिवासी समाजाला आव्हाहन केले आहे.

  • माझ्या समाज बांधवानो आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या मौलाच्या मताची ताकद ओळखून क्रूर प्रवृत्तीच्या सत्ताधार्यांना त्यांची योग्य जागा दाखवून द्या. -संतोष कुळमेथे, आदिवासी टायगर सेना, विदर्भ अध्यक्ष

To Top