आदिवासी बांधवा सोबत रंगपंचमी साजरी.

 

पाचगाव आदिवासी (गुडा) येथे आदिवासी समाज बांधवा सोबत गोड-धोड खाऊन एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२५ मार्च २०२४

राजुरा : आज धूलिवंदन फाल्गुन पौर्णिमा ज्याला आपण होळी, रंगपंचमी ह्यही नावाने ओळखतो सर्व देशभरात रंगपंचमीचा सण मोठा थाटात एक मेकांना रंग लावत आपल्यातले रुसवे-फुगवे विसरत ऐकावा दर्शवत साजरा केला जातो. याच प्रमाणे आज पाचगाव आदिवासी (गुडा) येथे अनेक वर्षांपासून पारंपरिकरित्या धूलिवंदन/होळी/रंगपंचमी आदिवासी समाज बांधव साजरे करत आले आहे. (Rangpanchami)

        आज सामाजिक बंधूभाव जोपासत श्री. दिलीप गिरसावळे (Mr. Dilip Girsawle) व मित्रमंडळी यांनी पाचगाव आदिवासी (गुडा) येथे भेट देत आदिवासी समाज बांधवा सोबत गोड-धोड खाऊन एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली. सोबतच आगामी लोकसभा निवडणूकि संधर्भात माहिती देते गावातील समस्या, अडचणी समजून घेत समोरील काळात सदर समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करेल असे श्री.दिलीप गिरसावळे यांनी सांगितले.

        या प्रसंगी श्री. लक्ष्मण कोवे, श्री. गंगू कुंबरे, रमेश कोटनाके, जगु कोवे, सिताराम कोडापे, यादव कोडापे, दौलत कोडापे, अजय कुमारे, विशेषराव कोडापे, मानकु कोवे, कुमार दुर्गे, बारीकराव कोवे, मारुती कोडापे, जंगु कोडपे,  प्रभाकर मडावी, कुमार दुर्वे, गावातील आदिवासी बांधव व इतर उपस्थित होते. (mahawani) (rajura) (pachgaon)

To Top