विवेकानंद वार्ड येथील झाशी राणी चौकचे नाव मार्बलवर नामकरण करण्यास नगर परिषद बल्लारपूर कडून टाळाटाळ.विवेकानंद वार्ड येथील झाशी राणी चौक चे नाव मार्बलवर नामकरण करण्या करिता नगर परिषद बल्लारपूर च्या मुख्याधिकारी यांना रोहन कळसकर यांचे वांरवार निवेदन. महावाणी - विरेंद्र पुणेकर
२३ मार्च २०२४

बल्लारपूर : शहरातील सर्वात मोठे वार्ड म्हणून ओळखले जाणारा विवेकानंद वार्ड येथील झाशी राणी चौक येथे (Vivekananda Ward Jhansi Rani Chowk) मार्बल प्लेटवर झाशी राणी चौकाचे नामकरण करण्या करिता झाशी राणी सांस्कृतिक मंडळ, बल्लारपूर (Jhansi Rani Cultural Mandal Ballarpur) चे अध्यक्ष रोहन कळसकर (Rohan Kalskar) हे गेल्या दिड वर्षा पासून (Ballarpur Municipal Council) बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ (Chief Officer Vishal Vagh) यांच्या कडे वारंवार निवेदन द्वारे, भ्रमणध्वनी द्वारे व प्रत्यक्ष भेटीतून मागणी करून सुद्धा बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी सदर मागणी पूर्ण केली नसून रोहन कळसकर जेव्हा जेव्हा मुख्याधिकारी विशाल वाघ यांना सदर मागणी संदर्भात विचारणा करतात तेव्हा ते बांधकाम विभागाला असलेले कंत्राटी कर्मचारी प्रणय वाटेकर (Pranay Watekar) यांच्या कडे बोट दाखवत भेट घेण्यास सांगतात.

        यावर नगर परिषद बल्लारपूर च्या मुख्याधिकारी यांना झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी नगर परिषद बल्लारपूर येथील मुख्याधिकारी या पदावर काम करणाऱ्या अधिकारी पेक्षा बांधकाम विभागात काम करणाऱे कर्मचारी प्रणय वाटेकर पदाने मोठे आहे काय असा सवाल करत मा. मुख्याधिकारी न. प. बल्लारपूर यांना लेखी स्वरूपात उत्तर मागितले आहे. (Is the contract employee bigger than the officer of Nagar Parishad Ballarpur? -Rohan Kalskar)

        नगर परिषद बल्लारपूरने विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील मागणी पूर्ण करण्यास होत असलेली टाळाटाळ या मागचे नेमके कारण काय हे लेखी स्वरूपात स्पष्ट करावे. तसेच मागणी तात्काळ पूर्ण न केल्यास आम्ही नगर परिषद बल्लारपूर यांच्या परवानगीविना स्वखर्चाने आम्हची मागणी पूर्ण करू अशा इशारा झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांना दिला आहे. 

  • कुठलीही टाळाटाळ करण्यात आलेली नाही. मी स्वतः सदर स्थळाला भेट दिली आहे. काही स्थानिकातून सदर कामाकरिता विरोध असून काहीकांची सुशोभीकरण करण्याची मांग आहे. लोकसभा निवडणुकी पश्चत सदर विषयावर निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या एकमता नुसार नगरपरिषदे मार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल -विशाल वाघ, मुख्याधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर

To Top