७० - राजुरा येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग संपन्न.

Mahawani

 

लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणूका प्रशिक्षण उत्साहात संपन्न.


महावाणि - विरेंद्र पुणेकर
२३ मार्च २०२४

चंद्रपूर/राजुरा : २०२४ समोरील महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक १३-चंद्रपूर लोकसभा मतदार संघ करिता २२ मार्च रोजी राजुरा येथील नक्षत्र हॉल (Nakshatra Hall) येथे श्री. विनय गौडा (Mr. Vinay Gowda), जी. सी. निवडणूक निर्णय अधिकारी १३- चंद्रपूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रशिक्षणाला रवींद्र माने, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी राजुरा ७०-राजुरा विधानसभा मतदार संघ, डॉ. ओमप्रकाश गोंड (Dr. Omprakash Gond), तहसीलदार राजुरा, शुभम बहाकर, तहसीलदार गोंडपीपरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. (70-Rajura Assembly Constituency) 

        प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या पद्धतीने व त्यातील बदल आणि बारकावे समजून घेऊन सर्वात महत्वाचा टप्पा मतदानाचा योग्य पद्धतीने होण्या करीता सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणात पीपीटी द्वारे माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थीसोबत चर्चात्मक पद्धतीने त्याच्या समस्या निराकरण करीत पोस्टल मतदान, मतदान प्रक्रियेचे टप्पे, एकूण मतदान केंद्राच्या पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करणे, मतदान यंत्र ओळख, मतदान युनिटची माहिती, मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी, निवडणूक साहित्य वितरण व स्वीकृती, मतदान साहित्य तपासणी, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदार केंद्रावर आदल्या दिवशी पूर्वतयारी, मतदान केंद्राची उभारणी, आदर्श मतदान केंद्राची रचना, मतदान यंत्र सदोष झाल्यास करावयाची कार्यवाही, मतदान अधिकारी कामे व कर्तव्य आदी विषयावर प्रशिक्षणा दरम्यान माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष मतदान यंत्र ईव्हीएम ची हाताळणी व पाहणी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी राजुरा तालुक्यातील विविध कार्यालयातील प्रशिक्षनार्थी उपस्थित होते. दोन टप्प्यात हे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षण सविस्तरपणे व समाधानकारक झाले अशी प्रतिक्रिया उपस्थित मतदान अधिकारी यांनी दिली. (mahawani) (rajura) (Lok Sabha Election 2024) (chandrapur)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top