आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ३ कोटींच्या विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण.

 

जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे औचित्य साधून राजुरा तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामांचे भूमी पूजन

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० मार्च २४

राजुरा : जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे औचित्य साधून राजुरा तालुक्यातील मौजा विहीरगाव येथे महिला बचत गट भवनाचे लोकार्पण आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. तसेच राजुरा तालुक्यातील विविध ठिकाणी आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर व पुर्णत्वास आलेल्या ३ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण पार पडले.

        यामध्ये मौजा विहीरगाव येथे १० लक्ष रुपयाचे महिला बचत गट भवन, १० लक्ष रुपयाचे सिमेंट काँक्रीट रोड, पाणी पुरवठा विभाग अंतर्गत ३ लक्ष रुपयाचे ऑनग्रीड सोलर सिस्टीम तयार करणे आणि ५ लक्ष रुपयाच्या सिमेंट काँक्रेट रोड बांधकामाचे लोकार्पण आ. सुभाष धोटेंच्या हस्ते पार पडले तर मौजा बामणवाडा येथे रस्ता बांधकाम करणे ३० लक्ष, मौजा चुनाडा येथे रस्ता बांधकाम करणे २५ लक्ष, मौजा सातरी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे १५ लक्ष, कोहपरा येथे रस्ता बांधकाम करणे २० लक्ष, विहीरगाव येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे ३० लक्ष, पांदन रस्त्याचे बांधकाम करणे २२ लक्ष, क्रीडांगण विकास करणे १० लक्ष, मौजा सिंधी येथे बंदिस्त नाली बांधकाम करणे १५ लक्ष, कविटपेठ येथे बंदिस्त नाली बांधकाम करणे १० लक्ष, चिंचोली येथे बंदिस्त गटारे बांधकाम करणे १५ लक्ष, सुब्बई येथे सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम करणे १० लक्ष, विरूर स्टेशन येथे नवीन वन उद्यानाला चेनलिंग फेसिंगचे बांधकाम करणे ३० लक्ष, सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम करणे २० लक्ष, रस्त्याचे बांधकाम करणे २० लक्ष इत्यादी विकासकामांचा समावेश आहे.

        या प्रसंगी विहीरगाव येथे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, सीडीपीओ सटाले, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, विहीरगावचे सरपंच नीलकंठ खेडेकर, माजी सरपंच अँड. रामभाऊ देवईकर, ग्रा. प. सदस्य प्रेमलता बोढे, माधुरी चिडे, मुख्यधपक गुलाने, मुख्याध्यापिका उपग्लनलावर मॅडम, इर्शाद शेख, रवी होरे, उद्धव पा साळवे, मनोहर धुडसे, मारोती वनकर, काशिनाथ चिडे, रमेश तेलंग तर विरूर स्टेशन येथे माजी सभापती कुंदाताई जेनेकर, सरपंच अनिल आलाम, अजय रेड्डी, सुरेश पावडे, राजु इग्रपवार, प्रीती पवार, सुनीता आत्राम, उमेश मोरे, रोशन झाडे, समाधान निमकर, इस्तयान खान पठाण, साधु सिंग, अमित सिंग टाक, विलास आकेवार, गणेश झाडे, नयन उराडे, विनोद इग्रपवार, संदीप मोरे, रामसिंग, गजानन बोढे, देवराव मिलमिले, अक्षय सोनपितरे, गणेश तुराणकर, लटारू नारनवरे, रामभाऊ ढुमणे, रवि वडस्कर, गुड्डू शेख, अशोक दरेकर, सौरभ आत्राम, बालाजी पाठक, भाष्कर सिडाम, प्रदीप पाल, खुशाल लांडे, रामु दामेलवार, प्रविण नांदेकर, विमलबाई वडस्कर, रत्नमाला कुडमेथे, अजय कोडापे, नामदेव चिडे, ज्ञानेश्वर तुराणकर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

To Top