"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमात आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळा राजुरा तालुक्यातून प्रथम.

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारी शाळा ; परिश्रमाने केलेल्या कार्याची फलश्रुती.- नलीनी पिंगे

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० मार्च २४

राजुरा : "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमात बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला राजुरा तालुक्यातून पहिला क्रमांकाचा मान मिळाला. तालुक्यातील अनेक शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख ,स्काऊट मास्तर बादल बेले यांच्या मार्गदर्शनात शिक्षक -शिक्षिका ज्योती कल्लूरवार,रोशनी कांबळे, रुपेश चिडे,वैशाली टिपले, जयश्री धोटे, सुनिता कोरडे, अर्चना मारोटकर यांनी शालेय परिसरात विद्यार्थी-पालक यांच्या सहकार्याने परसबाग, माजी विद्यार्थी संघ, शाळा मंत्रिमंडळ, राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड युनिट, आरोग्य तपासणी, विविध क्रीडास्पर्धा, शैक्षणिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती, शोषखड्डा, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, बचत बँक, गांडूळखत निर्मिती, तसेच मासिकपाळी ,स्वयंरक्षण, योगा, कौशल्य विकास , हातधुण्याचे प्रात्यक्षिक , शालेय पोषण आहार ,वाहतूक नियम, शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय परीक्षा यावर  मार्गदर्शन व चर्चा आयोजित केल्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच लक्ष पुढे ठेऊन या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. ("Chief Minister My School Beautiful School")

        तालुक्यातून पहिला क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे संचालक तथा माजी आमदार ऍड. संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी,सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार,संचालक लक्ष्मण खडसे, अविनाश निवलकर, मधुकर जाणवे, मंगला माकोडे आदींनी अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या समन्वय व परिश्रमामुळे हा क्रमांक आला असून वेळोवेळी जिल्हा व तालुका स्तरातून अधिकारीवर्ग यांचे मिळालेले मार्गदर्शन अतिशय महत्वाचे ठरले. तसेच परिश्रमाने केलेल्या कार्याची फलश्रुती झाल्याचे मत मुख्याध्यापीका नलीनी पिंगे व पर्यवेक्षक बादल बेले (Badal bele) यांनी व्यक्त केले. (rajura) (chandrapur) (mahawani)

To Top