चंद्रपुरात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचा तृतीय वर्धापन दिन मोठा उत्साहात साजरा !

 

समिती व जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या हस्ते नवनियुक्त राजकीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२७ फेब्रुवारी २४

चंद्रपुर : ग्राहकांची होत असलेली लूट, शोषण व वाढती फसवणूक पाहता ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांनी फसगतीला आळा बसवून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण होण्यास तसेच ग्राहकांना न्याय, हक्क प्राप्त करुन देत ग्राहकांसाठी सातत्याने कार्य करत काल 26 फेब्रुवारीला ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचा तृतीय वर्धापन दिन VIP गेस्ट हॉउस, चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपुर येथे ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या अध्यक्षतेखाली मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.

    ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचा तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून चंद्रपुर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी शिवसेना चंद्रपुर जिल्हा प्रमुख (राजुरा, चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र), माजी नगरसेवक मा. बंडूभाऊ हजारे (Bandubhau Hazare), शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या चंद्रपुर जिल्हा प्रमुखपदी शिवसेना बल्लारपुर तालुका प्रमुख जमील शेख (Jameel Shaikh), चंद्रपुर महानगर भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महामंत्रीपदी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हा संघटक दिपक नन्हेट (Deepak Nanhet) व नरपिंनदर सिंग विरदी (Narpindar Singh Virdi), चंद्रपुर महानगर भाजपा अल्पसंख्याक मोर्चा सचिवपदी शेखर पेरका (Shekhar Perka) यांची निवड झाल्याने ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र पुणेकर (District Vice President Veerendra Punekar), जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद धिमान,  जिल्हा सचिव मुन्ना इलटम, जिल्हा संघटक दिपक नन्हेट यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. (Rajura, Chimur and Bramhapuri assembly constituencies) (Arvind Dhiman)

    तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, शिवसेना भारतीय वाहतुक संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष तथा शिवसेना वैदकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान यांची निवडीबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. (Third Anniversary of Consumer Protection Committee)

    ग्राहकांना उद्धभवत असणाऱ्या समस्याचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती नेहमी ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यास कटिबद्ध असून सदैव ग्राहकांप्रती शासनाच्या असलेल्या सुविधा व त्यांचे हक्क त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे अविरत प्रयत्न करेल. तसेच शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राहक हितार्थ उपक्रमात सहभागी असेल. असे वर्धापन दिनी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती , चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी (Chandrapur District President Santosh Parkhi), जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र पुणेकर (District Vice President Veerendra Punekar), जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद धिमान, जिल्हा सचिव मुन्ना इलटम (District Secretary Munna Ilatam), जिल्हा संघटक दिपक नन्हेट व पदाधिकारी यांनी निश्चय केला. (mahawani) (chandrapur) (The third anniversary of the Consumer Protection Committee was celebrated with great enthusiasm in Chandrapur)

To Top