बाबापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेची स्थापना व कब्बडी चषकाचे उद्धाटन !

Mahawani

 

जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते रिबीन कापून शाखा फलकाचे अनावरण ; श्री. कोंडाय्या महाराज क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखेतर्फे भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२४ फेब्रुवारी २४

राजुरा/बाबापुर : श्री. कोंडाय्या महाराज क्रीडा मंडळ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा, बाबापूरच्या संयुक्त विद्यमानाने 26, 27 फेब्रुवारी भव्य पुरुष कबड्डी सामने आयोजित तसेच गावातील शाखेचे पुनरगठन करत मा. जिल्हाप्रमुख श्री. संदीप गिऱ्हे (Sandeep Girhe) यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण तसेच कार्यक्रमाच्या उद्धाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून लाभलेले मा. श्री. संदीप गिऱ्हे यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून उद्धव बाळासाहेब ठाकरे कबड्डी चषकाचे उदघाटन व  कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे (Baban Urkude) उपस्थित होते. 

    क्षेत्रातील मायबाप शेतकरी, बेरोजगार युवक, कामगारांना न्याय देण्यासाठी शिवसेना उ.बा.ठा सैदव्य तुमच्या पाठीशी आहे. असे प्रतिपादन यावेळेस बोलताना शिवसेना आणि कामगार नेते बबन उरकुडे यांनी केले. कबड्डी हा खेळ मैदानी खेड म्हणून जग प्रख्यात असून आज महाराष्ट्रात सदर खेळाची मोठी लोकप्रियता आहे तसेच कबड्डी खेळाचा उगम तामिळनाडू राज्यात झाला असून आज हा खेळ सर्व देश भरात मोठ्या प्रमाणात खेडला जातो तसेच सदर खेळ राष्ट्रीयस्तरावर क्रिकेट सारखाच लोकप्रियतेने गाजत असल्याचे आपण पाहत आहो या वर्षी प्रमाणेच पुढील वर्षी हि असेच कबड्डी चषक भरवू  असे  सदस्य - ग्रा. पं. मानोली (बु.) मुख्य संपादक - महावाणी न्युज तथा जिल्हाउपाध्यक्ष - ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूर मा. श्री. विरेंद्र पुणेकर यांनी व्यासपीठावरून गावकर्यांना संबोधित केले. 

      याप्रसंगी राजुरा तालुकाप्रमुख संदीप भाऊ वेंरागडे, युवासेना तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर (Bantibhau Malekar), उपतालुका प्रमुख रमेश झाडे, श्री. विरेंद्र पुणेकर (veerendra punekar), सुभाष आत्राम, किशोर बोडे, इंद्रजित वनकर, राजेंद्र गौऊकार , सुधाकर पडवेकर , सरपंच गोवरी आशाताई बबन उरकुडे, मंगला सुभाष आत्रम, गुड्डीताई राजू पाल, नजीकचे गावकरी  व बाबापुर-मानोली (बु.) वासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Establishment of Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray branch in Babapur and inauguration of Kabaddi Cup) (mahawani) (babapur) (rajura)


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top