राजुरा क्षेत्रातील आदिवासी तिर्थक्षेत्रांचा होणार विकास : आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश !

 

कोरपना व जिवती तालुक्यातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी धोरण निश्चित !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ फेब्रुवारी २४

राजुरा :  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे (#Subhash Dhote) यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातील कोरपना व जिवती तालुक्यातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या एकुण ९ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी धोरण निश्चित करून या सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी, आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विकास विभाग तसेच महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे क्षेत्रात जिवती, कोरपना तालुक्यात बहुसंख्य नागरिक हे आदिवासी, कोलाम समाजातील आहेत. या भागात आदिवासींचे एकूण ९ तिर्थक्षेत्र प्रसिद्ध आहेत. 

    नागरिकांचे ते आराध्य दैवत असून लोक मनोभावे पूजा, अर्चना करतात मात्र याकडे आदिवासी विकास विभागाचे अक्षय्य दुर्लक्ष होत असल्याने निधी अभावी आदिवासींचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास खुंटलेला आहे.

    आदिवासी बांधवांच्या तीर्थक्षेत्राचा विकास करणे, तेथील नागरीकांना सर्व सोई-सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाकडून सन २०२४-२५ पासून आदिवासी समाजाचे तीर्थक्षेत्र विकासाचे धोरण निश्चित करण्यात यावे.

    धोरण निश्चितीनंतर आदिवासी समाजाचे तीर्थक्षेत्र विकासाकरिता चंदपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील आदिवासीचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राचे ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना राज्याचे आदिवासी विकास विभाग प्रभारी मंत्री तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी सांगितले की, आ. सुभाष धोटे यांची मागणी स्वागतार्ह असून आदिवासी विकास विभागाशी चर्चा करून यावर लवकरच धोरण निश्चित करुन शासन निर्णय घेण्यात येईल व आदिवासी बहुल भागातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. आ. सुभाष धोटेंच्या मागणीला यश आले असून जिवती कोरपना तालुक्यासह महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागातील तिर्थक्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. #mahawani #rajura #chandrapur #jivati #korpana #Budget session (The strategy for the development of tribal shrines in Korpana and Jivati talukas has been decided)

To Top