माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते राधिका दोरखंडे हिचा सत्कार !

विद्यापीठाद्वारे आयोजित विद्यार्थ्यांच्या चर्चासत्र आणि पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये राधीकाचे उत्कृष्ट सादरीकरण !

 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ फेब्रुवारी २

राजुरा : गडचिरोली, नागपूर, अमरावती आंतर विद्यापीठाद्वारे गडचिरोली येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या चर्चासत्र आणि पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल राधिका अविनाश दोरखंडे (Radhika Avinash Dorkhande) हिचा शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप (Adv. Vamanrao Chatap), माजी नगराध्यक्ष रमेश नळे व राजुरा बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस यांनी राधिकाच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. 

    राधिका दोरखंडे हि विद्यार्थिनी सध्या पदवीचे शिक्षण घेत असून तिने पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना विद्यापीठाद्वारे आयोजित विद्यार्थ्यांचे चर्चासत्र व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. राधिकाणे सदर स्पर्धेत आपले उत्कृष्ट सादरीकरण करून भरघोस यश मिळविल्याबद्दल राजुरा विधानसभा शेत्राचे लोकप्रिय माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी राधीकाचे पाट थोपटून कौतुक केले. (Shetkari Sanghatna)

    यावेळी शे. सं. तालुकाध्यक्ष शेषराव बोंडे, कपील इद्दे, माजी नगरसेवक मधुुकर चिंचोलकर, भाऊजी कन्नाके, नरेंंद्र मोहारे, बळीराम खुजे, सुरज गव्हाणे, वर्षाताई दोरखंडे, धनश्री धोटे उपस्थित होते.  #mahawani (rajura) (chandrapur)

To Top