परत एकदा बाबापूर-मानोली गावच्या समस्या सोडवण्या करीता सरसावले बबनभाऊ !

 

स्वखर्चाने मुख्य मार्गावरील दुतर्फी झुडपांची विल्लेवाट !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२५ फेब्रुवारी २४

राजुरा/बाबापुर : तालुक्यातील बाबापूर-मानोली (बु.) मार्गाच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपाने आपले साम्राज थाटल्याने गाववासी व वाहतूककर्त्याला ये-जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागत होत. सदर मार्ग चंद्रपूरला संलग्न होत असल्याने नजीकचे गावातील नागरिक सदर मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतुक करत असतात. त्यात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे ये-जा करणाऱ्या मुख्य मार्गावर आपले डोके काढत असल्याने वाहतूक कर्त्यांना समोरील वाहन देखील दिसणे अश्यक्य झाले होते याने कित्तेकदा अपघात होता-होता टळला असे वाहतूक कर्ते सांगतात. सदर मार्गावरील समस्या शाशकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या निदर्शांत येत असून मार्गाकडे हित्पुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सदर समस्या आम्ही प्रशासनाच्या निदर्शनात आणून देऊन देखील समस्या बाबत प्रशासनाला कुठली हि जाग येत नसल्याचे गावकरी सांगतात. (Disposal of two-way bushes on the main road at own expense)

    ह्या समस्या गाववासीयांनी ग्रामपंचायत मानोली (बु.) समोर देखील मांडल्या परंतु संबंधित ग्रामपंचायतिच्या वतीने कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याने त्रस्त नागरिकांनी शिवसेना उप जिल्हाध्यक्ष बबनभाऊ उरकुडे (Shiv Sena Deputy District President Babanbhau Urkude) यांच्याशी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधून सदर समस्या समोर मांडली असता भाऊ कडून सकारात्मक उत्तर आले आणि आश्वासन दिले कि, तात्काळ सदर समस्या मार्गी लावू आणि काल २४ फेब्रुवारी रोजी मुख्य मार्गावरील सर्व काटेरी झुडपे जे. सी. बी. (JCB) च्या साह्याने काढण्यात आली. 

    मार्गावरील काटेरी झुडपां पासून मुक्तता मिळाल्याने गावकऱ्यात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्याने बबनभाऊ यांचे आभार मानले आहे. 

       या प्रसंगी समीर लोणारे, प्रशांत सोयाम, प्रदीप सोयाम, यश मिलमिले, रोहित नक्षीने, रितिक काळे, बंडू नागराळे, गणेश अडवे  व बाबापुर, मानोली (बु.) येथील गावकरी उपस्थित होते. (mahawani) (rajura) (shivsena u.b.t.)

  • दोन वर्षांपूर्वी सदर रस्ता शिवसेना (उ. बा. ठा) पक्ष्याच्या वतीने साफ करण्यात आला होता. या समोर हि गावकर्यांच्या हाकिला मी धावून येईल -बबन उरकुडे, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, शिवसेना (उ. बा. ठा)

To Top