रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे

Mahawani

 

रोटरीने ग्रामीण भागासाठी ही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे. 



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२५ फेब्रुवारी २४

राजुरा  : पाल हेरीस यांनी १९०५ मध्ये शिकागो येथे रोटरी ची स्थापना केली. तेव्हा फक्त ४ सदस्य होते. त्यांनी या छोट्याशा कार्यचे वटवृक्षात रुपांतर करून असंख्य सभासद व उपशाखा निर्माण केल्या आहेत. यामाध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. पोलीओ निर्मुलनात मोठे योगदान दिले, सुरुवातीला रक्तदान शिबीरांचे आयोजन व्हायचे मात्र अलीकडे आर्थोपेडीक उपचार, स्त्रीयांच्या आरोग्य समस्यांबाबत मेमोग्राफी व अन्य सुविधा सुध्दा पुरविण्यात येतात हे वाखाणण्याजोगे कार्य आहे. येणाऱ्या काळात केवळ शहरी भागापर्यंत मर्यादित न राहता समाजातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठीही रोटरीने कार्य करावे असे आवाहन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote) यांनी अंगद नगर, बामणवाडा रोड, राजुरा येथे रोटरी क्लब राजुरा द्वारा आयोजित रोटरी उत्सव २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी केले. रोटरी उत्सवाच्या माध्यमातून परिसरातील आबालवृद्धांना मनोरंजन व विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान सायं ५ ते १० :३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी आयोजकांच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना एक्झाम पॅड चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

         या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे (Arun Dhote), माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रितेश जयस्वाल, जेष्ठ व्यापारी राजेंद्र चांडक, बामणवाडाचे सरपंच भारती पाल, राजुरा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. कमल बजाज, सचिव रोटे सारंग गिरसावळे, कोषाध्यक्ष रोटे. निखिल चांडक, मयुर बोनगिरवार, अड. जगजीवन इंगोले, इंजि. शुभम खेडेकर यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (Rotary's activities are commendable) (mahawani) (rajura) (rotary club)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top