आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पेल्लोरा येथे शंकरपटाचे उद्घाटन व ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण.

 

जिल्हा वार्षिक निधी जनसुविधा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपये निधीअंतर्गत बनलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ फेब्रुवारी २४

राजुरा : राजुरा तालुक्यातील मोजा एलोरा येथे ब्रह्मनिष्ठ सद्गुरु बाजीराव महाराज यांच्या कृपेने बैलजोडी जंगी इनामी शंकर पटाचे आयोजन श्री. झिंगुजी वाटेकर यांच्या शेतात दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान करण्यात आले आहे. या शंकरपटाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज पार पडले. तसेच जिल्हा वार्षिक नियोजन सन २०२१ - २०२२ ग्रामपंचायतींना जनसुविधा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपये निधी खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. (Inauguration of Shankarpata and inauguration of Gram Panchayat Bhavan at Pellora)

       या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सभापती विकास देवाळकर, सरपंच अरुणा झाडे उपसरपंच मंगेश भोयर, देवराव ठावरी, कृ. उ. बा. स. संचालक विनोद झाडे, पेल्लोराचे वैद्यकीय अधिकारी अक्षय बुर्लावार, उपसरपंच मंगेश भोयर, ग्रा. प. सदस्य धोंडूजी बोडेकर, विलास तुरानकर, मंगला मोहितकर, कुंदा निरंजने, ममिता पेंदोर, पोलीस पाटील माधुरी खुजे, तमुस अध्यक्ष वसंता भोयर, सचिव निलेश डवरे,एकनाथ चटप, मंगेश भोयर, जगदीश सुर्तेकर, नंदकिशोर अडबाले, अंबादास निरंजने, शंकर बसासंकर, बालाजी भोयर, सुजित निखाळे, विनोद भोयर, वसंत भोयर, शंकर बोबडे, संभा कोंगरे, सुरेश भोयर, वासुदेव शेरकी, किशोर पेंदोर, शुभम बोबडे, रामकृष्ण धानोरकर, राकेश वांढरे, पांढुरंग कौराशे, राधाबाई उपरे, ताईबाई सुर्तेकर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संचालन सोयाम सर तर आभार आत्राम सर यांनी केले. (rajura) (subhash dhote) (mahawani) (chandrapur) 

To Top