दिव्यांगनिधी वितरणात दिव्यांग लाभार्थी असंतुष्ट !

Mahawani

 

बल्लारपूर नगरपरिषद मार्फत दिव्यांगांना निधी वितरणात मोठी कमतरता !

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ फेब्रुवारी २४

बल्लारपूर : केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम 1916 द-राईट ऑफ पर्सनल विथ डीसाबिलिटी ऑक्टोबर 2016 सदर अधिनियमातील नियम 37 दिव्यांगांना विविध योजनेमध्ये पाच टक्के आरक्षण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून बल्लारपूर नगरपरिषद च्या माध्यमातून दिव्यांगांना सण 2018 मध्ये तीन टक्के निधीच्या स्वरूपात खालील प्रमाणे वितरण करण्यात आले होते १) शंभर टक्के दिव्यांगांना पंचवीस हजार रुपये २) 80% टक्के दिव्यांगांना वीस हजार रुपये ३) 60% दिव्यांगांना पंधरा हजार रुपये ४) 40% दिव्यांगांना अकरा हजार रुपये, त्यावेळी दिव्यांग लाभार्त्याची संख्या 345 होती. केंद्र शासनच्या समर्थ दिव्यांग व्यक्ती अधिनियम 1916 मधील तरतुर्थीनुसार दिव्यांग निधीत तीन टक्क्यात वाढ करून 5% टक्के करण्यात आले असून सन - 2019 पासून बल्लारपूर नगरपरिषद मार्फत दिव्यांगांना निधी वितरणात मोठी कमतरता दिसून येत आहे.

उदाहरणार्थ- 2019 ते 2020 मध्ये 100% दिव्यांग दिव्यांग व्यक्तींना सहा हजार आठशे रुपये नगत आणि पाचशे रुपये किराणा किट देण्यात आले होते. त्यावेळी दिव्यांकांची संख्या 750 होती. सन 2021 ते 22 मध्ये 100% दिव्यांगांना सहा हजार सहाशे रुपये देण्यात आले होते. सन 2023 ला 100% दिव्यांग व्यक्तींना 4200 वितरीत करण्यात आले होते. परंतु सन 2023 ला दिव्यांग ची संख्या 725 असूनसुद्धा प्रत्येक दिव्यांगांना निधी वितरण करताना अन्याय केला जात आहे.

तसेच दरवर्षी सदर निधी मार्च महिन्यात वितरीत करायचा असतो तो निधी नगरपरिषद बल्लारपूर मार्फत दरवर्षी दोन ते तीन महिने उशिरा वितरीत करण्यात येतो नियम नुसार सदर निधी यावर्षी मार्चमध्येच वितरीत करण्यात यावा तसेच दिवांग बांधवांची समस्या जानून घेत सर्व लाभार्थी दिव्यांगाना व्यवसाइक रित्या सक्षम करन्या हेतूने योग्य रित्या नियमाचे पालन करत ५% निधी अंतर्गत वितरण कारण्यात यावे. अन्यथा दिव्यांग कल्याण व मल्टीपर्पज सोसायटी, बल्लारपूर मार्फत येत्या १५ दिवसात आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा मा. मुख्य अधिकारी यांना 12 फेब्रुवारी रोजी  निवेदनातून देण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग- विकास भगत, सुरेश केसकर, सुभाष जोळांगडे, संजय मेश्राम, राजेश  सुरमवार, भास्कर मंथनवार, रूपा राठोड, कांचन इटणकर, वनिता सोनुर्ले, व दिव्यांग बांधव उपस्थित होते. (Disabled beneficiaries are dissatisfied with the distribution of disability funds)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top