शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर यांची बल्लारपुरात बैठक संपन्न !

 

कामगार जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व चंद्रपुर वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांचा सत्कार !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ फेब्रुवारी २४

चंद्रपूर : शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ भाई शिंदे साहेब, शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब, तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांच्या आदेशाने तसेच पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या सुचनेनुसार व चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रयजी पईतवार व चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख गंगाधरजी बडुरे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे कामगार वर्ग व वाहतूकीची फार मोठ्या प्रमाणात  समस्या असल्याने चंद्रपुर शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिति चंद्रपुर जिल्हाध्यक्ष, संतोषजी पारखी (santosh parkhi) यांची कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली. तसेच वाहतूक संघटनेच्या चंद्रपुर जिल्हा प्रमुखपदी अरविंदजी दिमान (arvind dhiman) यांची नियुक्ति करण्यात आली.

त्यानिमित्य चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर VIP रेस्ट हॉउस येथे शिवसेनेचे चंद्रपुर उपजिल्हाप्रमुख कमलेशभाऊ शुक्ला, शिवसेनेच्या महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख ( बल्लारपुर, वरोरा व चिमूर ) मिनलताई आत्राम, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख तथा बल्लारपुर तालुका प्रमुख जमील शेख यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांचा व वाहतुक संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांचा सत्कार व अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. (Shiv Sena Indian Labor Union, Chandrapur)

यावेळी शिवसेनेचे भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, योगेश म्यानेवार व बल्लारपुर विधानसभा महिला आघाडीच्या विभा चौबे, चंदा शर्मा, राधा सिंह, गायत्री हिरण, माया वर्मा, आशा खंडेलवार, श्रुती ज्ञानेश्वर, पुष्पा हिरण, बेबी हिरण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (ballarpur) (chandrapur) (mahawani)

  • कामगारांच्या समस्या सोडवण्या करीता आम्ही २४ तास तत्पर असू आणि वाढत्या कामगारावरील अन्यायाला वाचा फोडून त्यांचे हक्क मिळवून देऊ. संतोष पारखी, जिल्हाध्यक्ष, शिवसेना कामगार संघटना

To Top