"AAP" बल्लारपूर चा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला चेतावणी !


पाणी बिलाची समस्या लवकर सोडवा व कार्यपद्धती सुधारा.

 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ फेब्रुवारी २४

बल्लारपूर : आम आदमी पार्टी द्वारा बल्लारपुर शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता सतीश गोरलावार (Sub Divisional Engineer Satish Gorlawar) यांना निवेदन देण्यात आले, MJP च्या कार्यपद्धतीमुळे बल्लारपूर शहरातील जनतेला विविध प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आधीही "AAP" तर्फे निवेदने देण्यात आली होती. आता पुनश्च जनतेच्या पुढील समस्यांबाबत ठोस पाऊले उचलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

  1. बल्लारपूर शहरातील जनतेला मनमानी पाणी बिल देणे बंद करा आणि सर्वांना समान सरासरी बिल द्या.
  2. कंत्राटदाराच्या संगनमताने बल्लारपूर शहरात टाकलेली नवीन पाईप लाईन नेहमी फुटत असून, हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा.
  3. बल्लारपूर शहरातील MJP कर्मचाऱ्यांनी आपली आडमुठी वृत्ती सुधारावी.
  4. बल्लारपूर शहरातील जनतेला दररोज नियमित वेळेत पाणी देण्यासाठी यशस्वी आराखडा तयार करावे.
  5. जुनी पाण्याची बिले माफ व प्रलंबित करून प्रत्येक घराला पाण्याची जोडणी द्या.
  6. भविष्यात मेंटेंन्स कालावधीत पाणी पुरवठा बंद असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.

या निवेदना नंतरही जर MJP तर्फे या मागण्यांसंदर्भात विचार करून २६ फरवरी २०२४ पर्यंत सकारात्मक लेखी माहिती देण्यात यावे अन्यथा त्यानंतर पक्षातर्फे आक्रमक भूमिका घेतली जाईल व या विरोधात तीव्र आंदोलन पुकारले जाईल असे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार (City President Ravibhau Puppalwar) यांनी आव्हान केले व या आक्रमक भूमिकेस सर्वस्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता बल्लारपूर, कार्यकारी अभियंता चंद्रपूर व संबंधित सर्व अधिकारी जबाबदार राहतील असे पक्षातर्फे चेतावण्यात आले. (Maharashtra Life Authority Sub Divisional Engineer Ballarpur)

यावेळी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, उपाध्यक्ष अफ़ज़ल अली और गणेश सिलगमवार, सचिव ज्योतिताई बाबरे, प्रवक्ता आसिफ शेख, संघटन मंत्री रोहित जंगमवार, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, युथ अध्यक्ष सागर कांबळे, रेखा भोगे, आशीष गेड़ाम, पप्पू श्रीवास्तव, मनीषा अकोले, जोत्सना जांभूळकर, गणेश अकोले, गौतम रामटेके, साईनाथ गजरेड्डीवार और अन्य उपस्थित होते ! ("AAP" Ballarpur's Warning to Maharashtra Life Authority)

To Top