श्रेया, तुषार, संकेत व सेहल यांची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेकरिता निवड.

 

अहमदाबाद गुजरात करिता चंद्रपूर जिल्हा संघ रवाना.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
14 फेब्रुवारी 24

राजुरा : भारतीय ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनिअर नॅशनल स्पर्धेचे आयोजन 16 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान गुजरात येथील अहमदाबाद विद्यापीठ क्रीडा मैदानावर आयोजित केल्या गेले आहे.

सदर स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्ह्या ॲथलेटिक्स संघटने तर्फे निवड चाचणी 10 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर निवड चाचणीत जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी 16 वर्षातील मुलींच्या गटात कु. श्रेया इथापे हिने 80 मीटर हर्डल स्पर्धे यश मिळविले तसेच मुलांच्या 16 वर्षातील वयोगटात संकेत सोंडकर ८० मीटर ऑर्डर, तुषार पचोरी लांब उडी, सेहल सोनी पेंटाथलोन क्रीडा प्रकारात यश प्राप्त केले असून. सदर खेळाडूंची निवड राष्ट्रीय आंतर जिल्हा ॲथलेटिक्स स्पर्धकरिता झाली आहे. अहमदाबाद गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळाडू रवाना झाली असून आकाश गुरगुले (akash gurnule) संघ व्यवस्थापक व कू. पूर्वा खेरकर ( purva kherkar) संघ प्रशिक्षिका म्हणून काम पाहातील, चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करीत कू. श्रेया इथापे (shreya ithape) ही फलक धारक असून तुषार पचोरी ( tushar pachori) हा जिल्ह्याचा ध्वज धारक म्हणून मानवंदना देणार आहे.  (at Ahmedabad Gujarat District Athletics Competition )

सदर राष्ट्रीय स्पर्धेकरिता सहभागी चारही खेळाडूंचे चंद्रपूर जिल्हा एथलेटिक्स संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले असून स्पर्धेत यश प्राप्ती करिता जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, जिल्हा सचिव श्री सुरेश अडपेवार, स्पर्धा व निवड समिती प्रमुख कु. पूर्वा खेरकर, जिल्हा संघटक प्रा. संगीता बांबोडे, श्री रोशन भुजाडे, कु.वर्षां कोयचाळे, श्री. मकरंद जी खाडे, श्री. प्रकाश तुमाने, श्री. अनिल गदगाल, डॉ. सुनील डाखोरे, श्री. विजय भगत, श्री. दर्शन मासिरकर, श्री स्वप्निल सायंकर, श्री. श्रीहरी गसकांती, श्री. मयूर खेरकर, श्री. राहुल जूवारे तसेच जिल्हा संघटनेच्या सर्व खेळाडूंनी व प्रशिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. (rajura) (mahawani)

To Top