सुमठाना येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात.

Mahawani


परस्पर स्नेहबंधातून सामाजिक सलोखा वृध्दिंगत करा : आमदार सुभाष धोटे. 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
०४ फेब्रुवारी २४

राजुरा : सुमठाना महिला बचत गटाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिम्मत्य ग्रामपंचायत सुमठाना येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मकरसंक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख उत्सव असून यानिमित्ताने सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन गावागावात परस्पर स्नेहबंधातून सामाजिक सलोखा वृध्दिंगत करण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. आपण सर्व एकसंघ, सुसंस्कृत आणि सशक्त असलो की आपला वैयक्तिक आणि सामाजिक विकास शिघ्रतेने होण्यास मदत होते. त्यामुळे आपला संसार सुखाचा करून सामाजिक सुखासाठी झटकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न प्रत्येकांनी करायला हवा असे मत व्यक्त केले.

         या प्रसंगी महिलांसाठी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तर उपस्थित सर्व महिला भगीणींना आकर्षक वाण भेट देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी सभापती कुंदा जेणेकर, राजुरा काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कविता उपरे, अंबुजा फाऊंडेशन च्या सुषमा दरेकर, सुमठाना चे सरपंच भाष्कर देवतडे, उपसरपंच अनुताई ताकसांडे, ग्रा. प. सदस्य सुनंदा मोहुर्ले, कल्पना मोहुर्ले, मनिषा देवाळकर, अरुण डंभारे, बोडगाव च्या सी. आर. पी. अर्चना बोंडे, सुमठाना च्या सी. आर. पी. समिक्षा सोयाम यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रजनी खामनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिषाताई देवाळकर यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (rajura) (subhash Dhote) (mla) (arun dhote) (mahawani)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top