राजुरात भव्य शेतकरी मोर्चा !


शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न व विविध मागण्या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०४ फेब्रुवारी २४

राजुरा : शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष, तालुका राजुरा जि. चंद्रपूर च्या वतीने विदर्भ वादी  शेतकरी संघटने नेते माजी आमदार ऍड. वामनरावजी चटप, स्वतंत्र विदर्भ प्रांताध्यक्ष मधुसूदन हरने यांच्या नेतृत्वात वेगळा विदर्भ राज्य, वनहक्क, शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न व विविध मागण्या घेऊन दि. ०३ फेब्रुवारी २४ रोजी राजरा येथे भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा भवानी मंदिर राजुरा येतुन प्रारंभ होऊन उपविभागीय अधिकारी  कार्यालय राजुरा येथे धडकला शेतकऱ्यांचा विविध मागण्या व इतर मागण्या संधर्भात मा. उपविभागीय अधिकारी, राजुरा यांना निवेदन देण्यात आले. या शनी ऍड. मुर्लीधरराव देवाळकर, जेष्ठे नेते, अरूण पा, नवले, जि.प्र.शे.सं., निळकंठराव कोरांगे, जि. प्र. स्वभाप, प्रा. ज्योत्सना मोहितकर, जि.प्र.शे.सं. महिला आघाडी, पोर्णिमा निरंजणे, जि.प. स्वभाप महिला आघाडी, प्रा. सतिश मोहितकर, जि. प्र.शे.सं. युवा अघाडी, प्रा. निलकंठराव गौरकार, जि. उपाध्यक्ष शे.सं., सुधिर सातपुते, जि.उ.शे.सं., ऍडशरददादा कारेकर, विभाग प्रमुख, सुनिल बावणे, जि.उ.स्वभाप, इंजि. पि. यु. बोंडे, जि. सचिव स्वभाप, दिनकर डोहे, जि. सचिव शे.सं., डॉ. संजय लोहे, जि. प्रचार प्रमुख, शेषराव बोंडे, ता.प्र.शे.सं., प्रभाकर ढवस, ता.प्र. स्वभाप,कपिल इदे, ता.प्र.शे.सं. युवा आघाडी, नरेंद्र काकडे, ता.प्र.स्वभाप युवा आघाडी, चंद्रकला ढवस, ता.प्र.शे.सं. महिला आघाडी, सिंधुताई बारसिंगे, ता. प्र. स्वभाप महिला आघाडी, सिंधुबाई लांडे, उपाध्यक्ष महिला आघाडी, दिलीप देठे, ता. उपाध्यक्ष शे.सं., अशोक मुसळे, माजी जिल्हाध्यक्ष, विनोद बारसिंगे, माजी सभापती, सौ. तेजस्विनी कावळे, माजी सभापती पं. स. राजुरा, हरिदास बोरकुटे, माजी सभापती कृ. उ. बा.स., कवडू पोटे, माजी सभापती कृ. उ.बा.स., आबाजी पा. ढवस, माजी पं.स. उपसभापती, दत्तुजी ढोके, माजी उपसभापती कृ.उ.बा.स., रमेश नळे, माजी नगराध्यक्ष राजुरा, व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. (shetkari sanghatna, rajura) (mahawani) (adv. wamanrao chatap)

To Top