राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांपासून वेतन नाही व CSTPS येथील कामगारांना २६ दिवस काम नाही !


चंद्रपूर, राजुरा व गोंडपिपरी येथील कामगारांच्या विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्याकरिता कामगार आयुक्तांची श्री. सुरज ठाकरे यांनी घेतली भेट

महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ जानेवारी २४

चंद्रपूर : आज  सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आम आदमी पक्ष (aap) चंद्रपूर चे कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी खालील कामगारांच्या विविध समस्या मार्गी लावणा संदर्भात चर्चा केली. 

६ महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

राजुरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आउट सोर्सिंग च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने क्लास 3, क्लास 4 वर्गातील विविध पदांवर काम करत असलेल्या एकूण ४८ महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून वेतन झालेला नाही. ही अवस्था सदस्थितीमध्ये  जिल्ह्यात सर्वत्रच आहे. परंतु सत्ताधारी तथा आजी-माजी हे क्रीडा महोत्सव साजरा करण्याकरिता करोडो रुपये खर्च केलेत, प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या बांधकामाला गडचिरोली तुन थाटामाटात जल्लोष करत करोड रुपये खर्च करून लाकडे नेली. या शोभा यात्रेसाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च करून मोठ्या थाटात महाकाली महोत्सव साजरा झाला. याशिवाय आता २२ जानेवारीला आनंदाचा शिधा वाटप करण्याकरता निश्चितच करोडो रुपये आणखी खर्च होतील.

"परंतु शासन इमर्जन्सी सेवेमध्ये मोडत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा वेतन देण्याचे का विसरत आहे ?

'आनंदाचा शिधा कुणी मागितला नाही तरी करोडो रुपये खर्च करून आनंदाचा शिधा वाटप करणारे सरकार. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे कधी देणार ? असा प्रश्न कामगारांना पडलेला आहे. कारण करोडो रुपये खर्च करून इव्हेंट साजरे करण्याकरता सामान्य जनतेच्या कमाईतून देण्यात आलेल्या पैशाचा वापर करणे सरकार कधी थांबवेल ? असा प्रश्न या वेळेस जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे व समस्त कामगारांनी उपस्थित केला. (suraj thakre)

गोंडपिपरी येथील सफाई कामगारांचा  २ महिन्यांपासून वेतन नाही

याबाबत आज कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक (Jai Bhavani Workers Union) अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्यासह समस्त कामगारांसमोर आयुक्तांनी नगरपंचायत येथील कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांना तात्काळ थकित वेतन देण्यास आदेश दिले.

CSTPS येथील पाईप कान्व्हेअर बेल्ट मधील  कामगारांना नियमितपणे २६ दिवस मिळत नाही

पाईप कान्व्हेअर बेल्ट मधील प्रकल्पग्रस्त कामगारांना कंत्राटदारांकडून आदी २६ दिवसाच्या कामा ऐवजी फक्त १५ दिवसच काम दिल्या जात होते या प्रकरणाला कंटाळून कामगारांनी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात जय भवानी कामगार संघटने तर्फे उपोषण केल्यानंतर  १५ दिवसा ऐवजी सदस्थितीमध्ये  २० दिवस काम देण्यात येत असून संघटनेची २६ दिवसाची मागणी ही कायम असल्याकारणाने याबाबत कामगार आयुक्तांनी आयोजित केलेल्या आजच्या बैठकीमध्ये CSTPS येथील कर्मचारी आणि श्री. सुरजभाऊ ठाकरे व समस्त कामगारांच्या समक्ष झालेल्या बैठकीमध्ये कामगारांना नियमितपणे २६ दिवस काम मिळावे याकरिता CSTPS येथील कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यास आयुक्तांनी आदेश दिले. 

अशाप्रकारे आज झालेल्या बैठकीमध्ये वरील सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याकरिता श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी कामगारांच्या समक्ष प्रशासनाला व वरील विविध समस्यांशी संबंधित असलेल्या उपस्थित कर्मचारी तथा कंत्राटदार यांना कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडून कामगारांवरील अन्याय जय भवानी कामगार संघटना यापुढे खपवून घेणार नाही असे सांगितले.(Rajura Sub District Hospital) (mahawani) (workers) 

To Top