राजुरा तालुक्यातील पत्रकार संघाना की प्रस्थापित नेत्यांना ह्यांची भीती.


पत्रकार संघ आमंत्रण नदेण्याचे कारण स्पष्ट करतील काय ?

महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ जानेवारी २४

राजुरा : बातमीचे शीर्षक वाचून आपण सगळे विचारात पडले असाल कि असे-कसे शक्य आहे आणि एकाद पत्रकारच कसा काय पत्रकार संघा बाबत बातमी करू शकतो परंतु पत्रकार म्हणजे अगदी निर्भीड पणे वावरणारे आणि समाजातील सत्य आपल्या लेखणीतून उतरवून शासनाचे कान पिळणारे. समाजातील शोषित व पीडिताची आवाज बनून न्याय देणारे आणि त्यांचा संघ म्हटलेकी कुणाची भीती. 

परंतु हो हे घडत आहे. राजुरा तालुक्यात 2 मुख्य पत्रकार संघ १.) मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेला राजुरा तालुका पत्रकार संघ २.) महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाशी संलग्न असलेला राजुरा पत्रकार असोसिएशन आहे.  

पत्रकार दिनानिमित्य दोन्ही संघांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये राजुरातील जवळपास सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु आम आदमी या राष्ट्रीय पक्षाचे व कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष व मुख्य बॉडी चे उपजिल्हाध्यक्ष आणि आप पक्षाचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे घोषित उमेदवार श्री. सुरज ठाकरे यांना मात्र आमंत्रित यादीतून वगळण्यात आले.  

या मुळे सर्वत्र चर्चेला उधाण आली आहे. सुरज ठाकरे यांचे विधानसभा क्षेत्रातील वाढते वजन आणि वाढती लोकप्रियता ही प्रस्थापित नेत्यांना धडकी देणारी आहे. यामुळेच कदाचित प्रस्थापित नेत्यांच्या आग्रहामुळे ठाकरे यांना २०२३ पासून पत्रकारांनी त्यांच्या वर्षातून एकदा होणाऱ्या कार्यक्रमाला बोलावण्याचे धाडस दाखविले नाही. 

सदर प्रकरणाने सुरज ठाकरे हे नाव प्रस्थापित नेत्यांना कडवे आवाहन देणारे ठरले असून अश्या द्वेषी वृत्ती मुळे सुरज ठाकरे यांची लोकप्रियता अधिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

सुरज ठाकरे यांचे संबंध वृत्तमान पत्रांच्या जिल्हाप्रतिनिधीशी सलोख्याचे आहेत परंतु स्थानिक पत्रकारांनी त्यांची नाराजी ओढून घेतल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.  निष्पक्ष पणे समाजात वागणूक अपेक्षित असणाऱ्या पत्रकाराना त्यांच्या कार्यकमाला भाऊंना बोलवायला भीती का वाटते ? तसेच दोन्ही पत्रकार संघ आमंत्रण नदेण्याचे कारण स्पष्ट करतील काय असा सवाल समर्थक करत आहेत.  तसेच सदर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकाही ऑनलाईन न्यूज पोर्टल संपादकांच्या नावचा उल्लेख नाही. सदर संघ न्यूज पोर्टलला काम करणाऱ्या पत्रकारानां पत्रकार मानत नाही का ? असा सवाल ऑनलाईन न्यूज पोर्टल संपादक, प्रतिनिधितून केला जात आहे. ( rajura ) (mahawani)

To Top