सामुहीक वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी गिलबिली येथे ग्रामसभा



महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ जानेवारी २४

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली (Gilbilly) येथे सामूहिक वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसभा घेऊन तज्ञ मार्गदर्शकांचे उपस्थितीत गावकऱ्यांच्या सहकार्याने सामूहिक वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला.

बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली गावाला ७ फेब्रुवारी २०१८ रोजी अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ मधील कलम ३ (१) (झ) अंतर्गत ५८१. ५४ हेक्टर क्षेत्रावर सामुहीक वन हक्क प्राप्त झाले आहे. सामुहीक वन हक्क प्राप्त झाल्यानंतर गिलबिली ग्रामसभेने मिळालेल्या क्षेत्राचा सामुहीक वन हक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडा तयार करून तालुका स्तरीय कन्वर्जन्स समितीला दाखल करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.यासाठी वन व्यवस्थापन आराखडा विषयावर तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यासाठी सामुहीक वन हक्क व्यवस्थापन समितीचे गठन करून व्यवस्थापन आराखड्यामध्ये कोणकोणती कामे समाविष्ट करावीत यासाठी गिलबिली येथे सोमवारी ८ जानेवारीला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. वन व्यवस्थापन आराखडा व वनहक्क कायदा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच गोपिका बुरांडे, (Sarpanch Gopika Burande) ग्रामसेवक सुषमा नंदेश्वर, (Sushma Nandeshwar) सामुहीक वन हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गेडाम, सामितीचे सचिव विकास सोयाम, खजिनदार गोपिका बुरांडे, तालुका वन व्यवस्थापक वैष्णवी चौधरीकर, एफईएस सामाजिक संस्थेचे तालुका प्रशिक्षक बंडू बोबाटे व गावातील सर्व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. ( chandrapur) (mahawani)

To Top