रास्तभाव दुकानदाराचे देशभरात बेमुद्दत दुकान बंद आंदोलन.

Mahawani


रास्तधान्या पासून कार्ड धारक वंचित होण्याची शकता.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० जानेवारी २४

राजुरा : रास्तभाव दुकान चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील "ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने" पुकारलेला बेमुदत संपात राजुरा तालुका रास्तभाव दुकानदार संघटना सहभागी होत तहसील कार्यालय, राजुरा समोर मोठ्या संख्येने काढला मोर्चा.

तालुक्यात सद्या 108 स्वस्त रास्तधान्य दुकाने असून रास्तधान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ, पूर्ण मार्जिनची रक्कम निर्धारित वेळेत, प्रति क्विंटल 300 रुपये मार्जिन, रास्तधान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा, प्रति महिना व्यवस्थापन खर्च 5 हजार रुपये तसेच वितरण तूट मंजूर करावे अस्या आपल्या मागण्या घेत आज तहसील कार्यालय समोर समस्थ राजुरा रास्तधान्य दुकानदाराने आपला मोर्चा चढवत मागण्या पूर्ण करण्या करीता मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

बेमुद्दत संपाने रास्तधान्य कार्ड धारकांना याचा चांगला फटका बसणार असून सदर संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राजुरा तसेच देशभरात एका-एकी धान्य बंद झाल्याने गोर-गरीब जनतेला धान्याच्या तडजोडी साठी मोठी मशक्त करावी लागणार आहे.  

मागील काही महिन्या पासून शासना मार्फत मोफत धान्य मिळत असल्याने आज बहुतांश राशन कार्ड धारक रास्तभाव दुकानातून मिळत असलेल्या धान्यावर अवलंबून असून आज रास्तभाव दुकानदारांच्या बेमुद्दत संपाणे तोंडचा घास जातो कि काय असे असे प्रश्न नागरिकात वर्तवले जात आहे. 

संप बेमुद्दत स्वरूपाचे असणार असून मागण्या पूर्ण होत पर्यंत धान्याची स्वीकृतीनागरिकांना धान्य वितरन व शासनाला माहिती पुरविणे पूर्णपणे बेमुद्दत बंद असणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पाल यांनी दिली. यावेळी विठ्ठल पाल, मंगेश गुरनुले, विनायक महकुलकर, प्रदीप भावे, अविनाश रामटेके, अनिल नगराडे, वसंता बारसागडे, लड्डू पाटील, विलास किनाके, वसीम भाई, नितीन भोंगडे, शांताराम बोबाटे असे राजुरा तालुक्यातील इतर रास्तभाव दुकानदार उपस्थित होते. (Vitthal Pal, Mangesh Gurnule, Vinayak Mahkulkar, Pradeep Bhave, Avinash Ramteke, Anil Nagarade, Vasantha Barsagade, Laddu Patil, Vilas Kinake, Wasim Bhai, Nitin Bhongde, Shantaram Bobate) (rajura) (mahawani) (Indefinite shop closure movement of fair shopkeepers across the country.) (Fair Shop Movement.)


बघा विडिओ



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top