जोगापूर देवस्थान येथे स्वच्छता अभियान संपन्न.


जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणी वनविभाग राजुरा यांचा संयुक्त उपक्रम.

मार्गशीर्ष महिना यात्रा संपल्या नंतर लगेच राबविले स्वच्छता अभियान.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
16 जानेवारी 24

राजुरा : जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा आणी वनविभाग वनपरीक्षेत्र राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने जोगापूर वन पर्यटन असलेल्या जोगापूर येथील मार्गशीर्ष महिन्यातील यात्रा संपन्न झाल्या नंतर लगेच स्वच्छता अभियान राबाविण्यात आले. याठीकाणी अनेक भक्त भाविक दर्शनाकरिता येत असतात. हे वन पर्यटन क्षेत्र राखीव असल्याने एरवी वनविभागाच्या परवानगी शिवाय याठीकाणी कोणीही जात नाहीत. परंतु जोगापूर यात्रे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील आणी अन्य ठिकाणचे भक्तभाविक हनुमान जी च्या दर्शनाला येथे येतात. अनेक नियमावली असताना देखील मोठ्या प्रमाणात या जोगापूर यात्रेच्या परिसरात प्लास्टिक कचरा व अन्य मोठ्या प्रमाणात अस्वछता पसरलेली असतें. त्यामुळे दरवर्षी या संस्थांनाच्या माध्यमातून वन विभाग, नगर परिषद यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविल्या जाते. यावेळी क्षेत्र सहाय्यक   एम. एन. निबुद्धे,विहीरगाव,  

एस. एम. संगमवार, टेंबूरवाही, पी. आर. मत्ते,राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मोहन मेश्राम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नरेंद्र देशकर, जिल्हा उपाध्यक्ष, प्रवीण लांडे, अध्यक्ष, जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुरा, रतन पचारे, विजय पचारे, संदीप आदे, अमर पचारे, श्रीरंग ढोबळे, मिलिंद गड्डमवार, तनय लांडे, सुरज सोमलकर, कैलास निवलकर, वनरक्षक एस. व्ही. गज्जलवार, रामपूर, पी. ए. मंदूलवार, राजुरा, पी. व्ही. देशमुख, खांबाळा, ए. एन. पोले, तुलाना, एस. आय. तोडासे, सुमठाना, एस. डी. सुरवसे, विहीरगाव, एस. आर. हाके, मूर्ती, बी. आर. दांडेकर, टेंबूरवाही, ए. बी. नेवारे, जोगापूर, एम. ए. चापले, चुनाळा, पी. देशमुख, खांबाळा,रवी बुटले, तुषार लांडे, सचिन दुर्बडे, विकास बल्की, राजकिरण पीपरे, संगीता पाचघरे, सचिन मोरे, उत्तम वनकर, किशोर वरवाडे, सुरेश बहादे, श्रीनिवास तुंगापेल्ली, प्रभुदास दाउधोट, मयूर आत्राम, नरेंद्र निखाडे, सुवर्णा बेले, सागर भावे आदिसह  जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणी वनविभाग राजुरा चे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गशीर्ष महिन्यातील ही जोगापूर यात्रा वाघासह अन्य वन्यप्राणी यांचे अस्तित्व असलेल्या या यात्रेला शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली. परंतु वन्य प्राण्यांना कसल्याही प्रकारे या काचऱ्यामुळे त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आले यासाठी वनपारिशेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे मानव -वन्यजीव संघर्ष न होऊ देता जोगापूर यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले. (Cleanliness campaign completed at Jogapur Devasthan) (jogapur) (rajura) (mahawani)

To Top