आदर्श शाळेत स्काऊट्स - गाईड्स ची खरी कमाई उपक्रम संपन्न.

Mahawani
2 minute read
0


विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारिक ज्ञान.
अनेक पदार्थ्यांच्या स्टोल्स ने वेधले लक्ष.

राजुरा : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील स्काऊट्स -गाईड्स युनिट व आदर्श हायस्कुल येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाचे विद्यार्थी तसेच अन्य विध्यार्थी मिळून वेगवेगळ्या पदार्थांचे साठ स्टोल्स खरी कमाई उपक्रमा अंतर्गत लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून सतीश धोटे, अध्यक्ष, बा.शी.प्र.मं. हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव येसेकर, सचिव बा.शी.प्र. मं., प्रमुख अतिथी म्हणून आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सतीश धोटे म्हणाले, विद्यार्थ्यांना व्यावहारीक ज्ञान मिळावे, पदार्थ्यांची माहिती, जमा -खर्च, स्वतः परिश्रम केल्याने श्रमाची जाणीव व्हावी, स्वावलंबन, स्वच्छता, पदार्थ निर्मिती करिता लागणारे साहित्यांची नावे आदि विषयीचे ज्ञान मुलांना मिळते असे प्रतिपादन केले. भास्करराव येसेकर यांनीही मुलांना यथोचित मार्गदर्शन केले. खरी कमाई उपक्रमातील काही रक्कम ही चंद्रपूर जिल्हा स्काऊट्स -गाईड्स कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. यावेळी खरी कमाई आनंद मेळाव्या विषयी अनेक विध्यार्थ्यांनी फार सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इडली, ढोकळा, पाणीपुरी, चायनीज, झुणका भाकर, चिवळा, चनापोहा, बोर, अप्पे, ब्रेडपकोडा असे अनेक पदार्थ्यांचे साठ स्टोल्स आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. शाळेत उपस्थित विध्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक-शिक्षकांनी सुद्धा खरी कमाई, आनंद मेळाव्याचा आस्वाद घेत विध्यार्थीना सहकार्य केले. बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. स्काऊट मास्तर रुपेश चिडे, जिजामाता गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, ज्योती कल्लूरवार, वैशाली टिपले, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, मेघा वाढई, विकास बावणे, आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते,माधुरी रणदिवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर बादल बेले यांनी केले. (Scouts at Adarsh School) (rajura) (mahawani)

Tags

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top