आ. सुभाष धोटेंच्या हस्ते अडेगाव व चेकदरूर येथे नाली आणि वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन.


सुपगाव येथे कार्यकर्ता बैठक : नागरिकांशी संवाद. 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ जानेवारी २४

गोंडपीपरी : सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंडपिपरी क्र. २ च्या २५१५ ग्रामविकास निधी सन २०२३ - २०२४ अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील मौजा आडेगाव येथे सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १२.५ लक्ष रुपये आणि मौजा चेकदरूर येथे सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १२.५ लक्ष आणि जिल्हा खनिज निधी च्या सन २०२१ - २०२२ अंतर्गत वाचनालय इमारतीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत २० लक्ष रुपये मंजूर निधीच्या विकासकामांचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भेट देऊन विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधला. तसेच सुपगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. 

         या प्रसंगी आडेगाव येथे सुनील संकुलवार, यु. काँ. चे विपिन पेदुलवार, श्रीनिवास कंदनुरिवार, बालाजी चणकापुरे, विनोद नागापुरे, संजू झाडे, सरपंच रेखाताई चौधरी, उपसरपंच विजय चौधरी, ग्रा प सदस्य शालिक झाडे, पुंडलिक उंबरकर, संतोष कोवे, पुरुषोत्तम रेचनकार, निमित मेश्राम, संजय माडुरवार,  चेकदरूर येथे सरपंच अमोल भोयर, ग्रा प सदस्य गौतम धुरके, गणपत नागापुरे, संगीता झाडे, संजय झाडे, भास्कर झाडे, आशिष भोयर, पियुष भोयर, उद्धव पराते, चंद्रशेखर खेडेकर, सुपगाव येथे सरपंच जोत्स्ना भोयर, उपसरपंच जयश्री येलेकर, ग्रा प सदस्य प्रकाश चौधरी, बंडू  उराडे, गिरमाजी येलेकर, पुंडलिक येलमुले, तमुस अध्यक्ष गजानन आऊतकर यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (gondpipari) (mahawani)

To Top