वे.को.ली रुग्नवाहीका चालकांना मिळाला न्याय

मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या पुढाकारला यश !महावाणी -  विरेंद्र पुणेकर
१७ डिसेंबर २३

        चंद्रपूर : येथील वेकोलीच्या रुग्नालयासाठी देन्यात आलेल्या रुग्नवाहिकेच्या चालकांना मागील दोन महीन्यापासून वेतन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रुग्नवाहिका चालकांनी रुग्नवाहिका थेट मुख्य महाप्रबंधकाच्या कार्यालयात आनून उभ्या केल्या व जोपर्यंत वेतन आणि बोनस मिळणार नाहि तोपर्यंत संप चालु ठेवण्याच्या निर्णय घेतल्याने वेकोलिच्या रुग्नालयातील रुग्नांना ये- जा करण्यास मोठी अडचन निर्माण झाली होती रुग्नवाहिका चालकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने कुटुबांचा उदरनिर्वाह करन्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते इतकच नव्हे तर रुग्नवाहिका चालकांना कामावरून काढण्याची धमकी सुद्धा देन्यात आली होती हि गंभीर बाब मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार मनविसे जिल्हाउपाध्यक्ष श्री. कुलदिप चंदनखेडे, प्रविण शेवते, क्रिष्णा गुप्ता यांना कळताच त्यांनी रुग्नवाहीका चालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जानून घेत हायप्राईड या कंपनीचे कंत्राटदार व मूख्य महाप्रबंधक साहेब यांची भेट घेऊन आज दिनांक १७/१२/२०२३ ला या १८ रुग्नवाहिका चालकांना वेळेवर वेतन देन्यात यावे यांच्या सर्व समस्याचे निराकारन करावे अशी मागणी केली असता संबंधीत कंत्राटदार व मूख्य महाप्रबंधक साहेब यांनी वेतन १२५००/- या वेतणात वाढ करून १४ हजार हरमहा वेतन दिले जाणार आणि महिन्याच्या १५ तारखेपर्यंत नियमीत वेतन देन्याचे आश्वासन दिले असून मनसेच्या माध्यमातून या रुग्नवाहिका चालकांना न्याय मिळाला आहे यामूळे रुग्नवाहिका चालकांनी मनसेचे आभार मानले असून श्री. किशोर मडगुलवार जिल्हासचिव मनसे, श्री. कुलदीप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, श्री.प्रविण शेवते तालूका उपाध्यक्ष मनविसे तथा मनसेचे रुग्णमित्र श्री. क्रिष्णा गुप्ता आणि मनसैनिक उपस्थित होते यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. ( w.c.l ambulance drivers got justice ) ( manse ) ( mahawani )( chandrapur )

To Top