कल्याण काॅलेज ऑफ नर्सिग येथे फ्रेशर्स पार्टीचे आयोजन.महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ डिसेंबर २३

        राजुरा : इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित कल्याण काॅलेज ऑफ नर्सिग येथे बि. एस्सी प्रथम वर्षांच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या ए.एन.एम ( anm ), जी. एन. एम., बी. एस. सी. ( gnmbsc )(नर्सिंग), ( nursing )पोस्ट बी. एस. सी. (नर्सिंग) विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये स्नेहपूर्ण वातावरण तयार होऊन त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

       या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष घोटे ( subhash dhote ), प्रमुख अतिथी सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे ( arun dhote ), मुख्याध्यापक रफिक अंसारी ( rafik Ansari ) यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 

          यावेळी ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, रॅम्पवॉक, वेस्टर्न डान्स, गायनातून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. विविध प्रकारच्या खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. प्राचार्य शिंदे आणी श्री. रफीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिस्टर आणि मिसेस फ्रेशर्स ची निवड करण्यात आली. मानाचा किताब नर्सिंगच्या मीस फ्रेशर्स (ए. एन. एम.) मीस फ्रेशर्स कु निकिता आत्राम, आणि मीस्टर फ्रेशर्स अक्षय ढवणे जी. एन. एम, मीस्टर फ्रेशर्स निशांत सांगोडे, मीस फ्रेशर्स कु. जानवी बोरकर, बी. एस. सी. अभ्यासक्रम यांनी पटकावला. ( mahawani ) ( rajura ) ( Organized freshers party at Kalyan College of Nursing. )

To Top