१८ डिसेंबर २३
१७ डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 5 च्या सुमारास लव्ह-इंडिया चर्च ( Love-India Church ) येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात अष्टभुजा वॉर्ड कॉम्प्लेक्स व लगतच्या नागरिकांनी मोठ्या संखेने घेतला सहभाग शिबिरात 400 नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची निशुक्ल तपासणी करत घेतला मोफत औषध वितरणाचा लाभ.
कार्यक्रमाचे आयोजक फादर सुनील कुमार, लव्ह-इंडिया संस्थेचे अध्यक्ष, चांदपूरच्या प्रसिद्ध कुबेर रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. श्री. प्रवीण वर्गघने, डॉ. सारंग पद्मवार, (बालरोगतज्ञ) डॉ. मुकुंद पालीवाल, इत्यादी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते ( Dr. Mr. pravin wargdhane, Dr. Sarang Padmawar, (Pediatrician) Dr. Mukund Paliwal ) शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री.विजय नळे, विजय मेश्राम, अरुण लोणेरे, डॉ. मनोज सर, मुन्ना एलटेम, दीपक नानेट यांचे प्रमुख योगदान होते.
शिबिरा प्रसंगी मा. डॉ. पालीवाल साहेब म्हणाले की, मी पर्यावरणपूरक योजनेवर मागील काही काळा पासून कार्य करीत असून आपल्याकडील टाकाऊ वस्तू जसे प्लास्टिक, जुने कापड, इत्यादी गोळा करून दर आठवड्याला माझ्या कळे सुपूर्त करा सदर टाकाऊ वस्तू पासून उपयोगितेच्या वस्तू तयार करत पर्यावरणपूरक कार्यात माझा व आपला खारीचा वाटा देता येईल.
मा. सविश कुमार धोतेकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन करत केली कार्यक्रमाची सांगता. ( chandrapur ) ( mahawani )