विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक अभिरुची वाढते -आमदार सुभाष धोटे.



महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ डिसेंबर २३

        राजुरा : ५१ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी ( Taluka Level Science Exhibition ) २०२३ - २०२४ चे आयोजन एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल, वरोडा ( Eklavya English Medium School, Varoda ) येथे समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही संकल्पना घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती राजुराच्या शिक्षण विभागाद्वारे विज्ञान प्रदर्शनी करण्यात आले. सकाळी ९:३० वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे ( subhash dhote ) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. धोटे म्हणाले विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यात अधिक रुची घेऊन पारंगत व्हावे. विज्ञान प्रदर्शनींच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिरुचीत वाढ होते. यातूनच पुढे मोठे वैज्ञानिक घडण्याची प्रेरणा मिळते.

        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे ( BDO Hemant Bhingardive ), शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण ( Education Officer Kalpana Chavan ), वारोड्याचे सरपंच वनमालाताई काटकर, सृष्टी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पोडे, उपाध्यक्ष सुनील उरकुडे, सचिव आशिष देरकर, गटशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण, एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्या पौर्णिमा पोडे, माजी सरपंच सुनिल वांढरे, पोलीस पाटील शालिक पोडे, विजय परचाके, मनोज गौरकर, संजय हेडाऊ यासह तालुक्यातील अनेक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. ( mahawani ) ( Science fair ) ( varoda ) ( rajura )

To Top