गुंड प्रवृत्तीच्या टोळीनी पैशाची मागणी करत दिली जिवे मारण्याची धमकीमहावाणी - विरेंद्र पुणेकर
१० डिसेंबर २३

        जिवती : तालुक्यातील हिमायतनगर( himayatnagar ) येथील शेख ताजुद्दीन वजीर साहब (४०) यांच्या राहते घरी दि. 27/11/2023 रोजी सायंकाळी 06:45 वा. चे सुमारास एका पाढ-या रंगाची बलेनो चारचाकी क्र. MH-34-BV-3392 या वाहनाने पाच ईसम येत अश्लील शिवीगाळ करून एक लाख रुपयाची खंडणी ची मागणी केली. 

        जर पैसे नाही दिले तर मला व माझ्या परिवाराला कायमचे संपून टाकेल या शब्दात धमकी दिली. तसेच ताजीम ताजुद्दीन शेख (17) व सरताज ताजुद्दीन शेख (16) या माझ्या दोन्ही मुलांना धक्का-मुक्की करत मारहान केली. व तुला एकाद खोट्या आरोपामध्ये फसवुन टाकीन अशी संदिप शिंदे व त्याचे चार मित्रांनी धमकी दिली. तरी सदर गुंडान पासून मला व माझ्या परिवाराला  जीवाचा धोका निर्मान झाल्याची तक्रार शेख ताजुद्दीन वजीर साहब ( Sheikh Tajuddin Wazir Sahab ) (४०) यांनी पोलिस स्टेशन टेकामांडवा ( tekamandwa ) येथे केली. 

       त्यानुसार पोलीस स्टेशन टेकामांडवा येथे संदीप शिवाजी शिंदे, हनुमंत विठ्ठल कुसळे, राहुल राजू मुक्कावार, दत्ता शंकर मस्के व राजू बट्टलवार यांच्याविरुद्ध कलम १४३, १४७, २९४, ३२३ व ५०६ नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहे. समोरील तपास पोलीस उपनिरीक्षक- रवींद्र महैसकर ( Sub-Inspector of Police- Ravindra Mahaiskar. ) यांच्या निदर्शनात केला जात आहे. ( Sandeep Shivaji Shinde, Hanumant Vitthal Kusale, Rahul Raju Mukkawar, Datta Shankar Muske and Raju Battalwar ) ( mahawani ) ( tekamandwa ) ( jivati )

To Top