इन्फंट शाळेत क्रीडा महोत्सवाचे आयोजन.महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० डिसेंबर २३

        राजुरा : इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या वतीने दिनांक 22 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाची सुरुवात ही शाळेचे ध्वज फडकवून तसेच टार्च मार्चने करण्यात आली. यावेळी शाळेतील चार ग्रुप म्हणजेच आकाश, वायू, अग्नी, धरती असे चार हाऊस पाडून त्यांच्यामध्ये विविध खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

        त्यात इयत्ता पहिली ते तिसरी, इयत्ता चौथी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते दहावी  असे विद्यार्थ्यांचे गट तयार केले गेले त्यात लिंबू चमचा, थ्रोबॉल, डॉजबॉल, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, मार्बल रेस, टगाफॉर अशा विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेत्तर  कर्मचारी यांचे सुद्धा खेळाचे आयोजन करण्यात आले होते. 

     या प्रसंगी सीबीएसई विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा संजय अलोने, स्टेट विभागाच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू तसेच मुख्याध्यापक रफिक अन्सारी आणि शाळेतील हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, शुभम बन्नेवार, सहाय्यक शिक्षक सुभाष पिंपळकर शाळेतील क्रीडा कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सागर यांनी केले या कार्यक्रमाची सांगता शाळेचा ध्वज उतरवून शेवटी राष्ट्रगीताने करण्यात आली. ( mahawani ) ( Infant Jesus English High School Rajura ) ( Sports festival )

To Top