वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा -बी.आर.एस. नेते भूषण फुसे यांची मागणीमहावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ डिसेंबर २३

        चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी BRS पक्षाचे नेते भूषण फुसे ( bhushan fuse ) यांच्या नेतृत्वात 12 डिसेंबरला जिवती ते विधानभवन नागपूर ( Vidhan Bhavan Nagpur ) बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत 8 डिसेंम्बरला आयोजित पत्रकार परिषदेत फुसे यांनी सविस्तर माहिती दिली.

         चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आज अडचणीत आला आहे, आज असंख्य समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे, मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी शासन त्यांच्यावर अन्याय करीत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी भूषण फुसे BRS पक्षाच्या माध्यमातून हा मोर्चा काढत आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय ?

        चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज तात्काळ घोषित करून देण्यात यावे, कर्ज माफ करीत सातबारा कोरा करावा, शेतीच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रान डुक्करांची नसबंदी करण्यात यावी, धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांना उद्योगधंद्यात रोजगार देण्यात यावा, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, राजुरा व गोंडपीपरी तालुक्यात सुरू असलेले जुगाराचा अड्डे बंद करावे अश्या विविध मागण्यांसाठी बैलबंडी मोर्चा जिवती तालुक्यातून थेट विधानभवनावर 16 डिसेंम्बरला धडकणार आहे.

मोर्च्यांचे नियोजन काय ?

        12 डिसेंम्बरला सकाळी 9 वाजता शेतकरी आपल्या बैलबंडी सह जिवती येथून प्रारंभ करतील त्यानंतर गडचांदूर, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, खांबाडा, जाम, बुट्टीबोरी नंतर 16 डिसेंबरला मोर्चा विधानभवनावर धडकणार.

वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - भूषण फुसे

        माननीय नागपूर उच्च न्यायालयाने रानटी डुक्कर मारण्याच्या जीआर विरुद्ध निकाल दिला. या निकाला विरुद्ध वनमंत्री साहेब सर्वोच्च न्यायालयात का नाही गेले.

रान डुकरांमुळे उभ्या शेतीचे नुकसान होत आहे, याबद्दल वनमंत्री काही ठोस भूमिका का घेत नाही? जिल्ह्यातील वाघांची संख्या वाढत आहे त्याला नियंत्रण करण्यात व वन प्राण्यांचे नियोजन करण्यात वनमंत्री अपयशी ठरले आहेत. देशाचे पंतप्रधान जर आफ्रिकेतून चिता आणू शकतात तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे स्थलांतरण व पुनर्वसन का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील निर्दोष, निष्पा शेतकऱ्यांचा, गुराख्यांचा व नागरिकांचा जीव जातोय याबद्दल काहीच वाटत नाही का? वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सर्व प्रश्न हाताळण्यास अपयशी ठरल्याने त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे. ( mahawani ) ( brs ) ( chandrapur ) ( Forest Minister )To Top