राजुरा येथे युवक काँग्रेसच्या बूथ जोडो युथ जोडो अभियानाला सुरूवात.महावाणी -  विरेंद्र पुणेकर
२५ नोव्हेंबर २३

            राजुरा: राजुरा तालुका काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या पुढाकाराने राजुरा युवक काँग्रेस ची बूथ जोडो युथ जोडो आढावा बैठक उत्साहात पार पडली आणि राजुरा येथून युवक काँग्रेसच्या बूथ जोडो युथ जोडो अभियानाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, युवक काँग्रेसची 'एक बुथ दस युथ' ही संकल्पना अतिशय उत्तम असून तितक्याच ताकदीने या संकल्पला कार्यान्वित करण्यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेणे आवश्यक आहे. आज भारताची खरी ताकद आपला युवक असून युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहेत. अशा कार्यक्षम युवकांना पक्षसंघटनेत संधी देऊन गावागावात, शहराशहरात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

         या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस चे प्रभारी केतन रेवतकर, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, अभिजीत धोटे, राजुरा विधानसभा यु. काँ. अध्यक्ष उमेश गोनेलवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, आर्वी चे सरपंच सुरज माथनकर, कोमल फुसाटे, संदिप नन्नावरे, ग्रा. प. सदस्य श्रीधर रावला, शरद शेंडे, यु. काँ. चे जिल्हा महासचिव प्रणय लांडे, अशोक राव, आकाश माऊलीकर, निरंजन मंडल, श्रीकांत चीतलवार, रोहित नांदे, धनराज सतरे, परितोष पाल यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

To Top