शिवसेना (उ. बा. ठा) ला जय महाराष्ट्र करून सरपंच, उपसरपंच ग्रा. पं. मानोली (बूज) यांचा भाजपात पक्ष प्रवेशमहावाणी - विरेंद्र पुणेकर
२४ नोव्हेंबर २३

        राजुरा : मागील वर्षी झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या बाबापुर, मानोली (बूज) गट ग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच, काही सदस्य व गावकरी यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश विकासाची नवी धुरा हाती घेत जोमाने गावाचे विकास कामे करण्या करीत सदर ग्रामपंचायत चमू समेत शिवसेना (उ. बा. ठा) ला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश सदर ग्रामपंचायत मधिल सदस्यांचा पक्ष प्रवेश जिल्हा महामंत्री ओबीसी आघाडी चंद्रपूर सदिपजी पारखी यांच्या प्रयत्नातून घेण्यात आला.

      नक्षत्र लॉन येथे झालेल्या दीपोत्सव, स्नेह मिलन सोहळ्यात पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री, मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज जी अहिर यांच्या अध्यक्षते खाली सदर ग्रामपंचायतिचा पक्ष प्रवेश करण्यात आला. 

     सरपंच - सौ. मंगला सुभाष आत्राम, उपसरपंच - सत्यशीला वरारकर, सदस्य - गुड्डी पाल, सुभाष आत्राम, वच्छला कन्नाके, गावकरी - राजेंद्र गौरकार, रामदास करडभुजे, विकास करडभुजे, राजू पाल, राजू गाढवे, इंद्रजीत वनकर, धनराज वनकर, पिंटू कायडिंगे, निलेश मिलमीले, प्रशांत वरारकर, गोलू अडवे, अनुप झाडे, शुभम पेरकंडे इत्यादीने पक्ष प्रवेश केला. 

     पक्ष प्रवेशवेळी राजुरा विधानसभा शेत्राचे माजी. आमदार - संजय भाऊ धोटे,  मा. खुशाल भाऊ बोंडे, तसेच पक्ष प्रवेश करीत विशेष कामगिरी बजावणारे ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री - संदीप पारखी यांच्या समेत पक्षप्रवेशकांचा सत्कार करण्यात आला. ( mahawani )  ( rajura ) ( BJP ) ( manoli bk )

To Top