चंद्रपूर शिवसेना उपशहर प्रमुखपदी सूचक दखने तर चंद्रपुर उपतालुका प्रमुखपदी गुरु मेश्राम यांची नियुक्ति


शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना चंद्रपूर महानगर प्रमुख मा. भरतभाऊ गुप्ता यांच्या मार्गदर्शनात असंख्य कार्यकर्त्तेसह दखने व मेश्राम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश!महावाणी - विरेंद्र पुणेकर
२३ नोव्हेंबर २३

            चंद्रपुर : शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना.  एकनाथजी शिंदे यांचे आदेशाने व किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे सूचनेनुसार श्री दत्तात्रय जी पैईतवार साहेब संपर्कप्रमुख राजुरा, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र यांनी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख मा. संतोषभाऊ पारखी यांचे नेतृत्वात तसेच शिवसेना चंद्रपूर महानगर प्रमुख मा. भरतभाऊ गुप्ता यांच्या मार्गदर्शनात घुटकाळा वार्डातील सामाजिक कार्यकर्त्ते मा. सूचक दखने यांची चंद्रपुर उपशहर प्रमुखपदी व वरवट येथील शिवसेनेचे (उ.बा.ठा.) निष्ठावंत सामाजिक कार्यकर्त्ते मा. गुरुभाऊ मेश्राम यांची चंद्रपुर उपतालुका प्रमुखपदी नियुक्ति करण्यात आली.

तसेच त्यांचे समर्थक विश्वास खैरे, विठ्ठल लोनबले, विठ्ठल टेकाम, राजेश सूत्राळे, राजेश दाढ़े, आदर्श दखने, किशोर धनेवार, किरण जोगी, कुणाल दखने, मनमोहन जवादे, सुनिल लखदिवे, अविनाश क्षिरसागर, राजू धनेवार, प्रकाश मैदळकर, विवेक जोगी, भारत जुमड़े, दत्तू डेकाटे, मंगेश पेटकर, गणेश वांढरे, गोपीचंद धान्डे, सुनिल कुमरे, शंकर धावंजेवार, राजू गोजे, संतोष अलोणे, स्वप्निल मुधोळकर, राकेश गोजे, संगीता धुर्वे, संगीता कुळमेथे, कल्पना धुर्वे,संगीता मांदाळे, योगिता दखने, अनिता सुत्राळे, संगीता धावंजेवार, मिना पेटकर, सपना दाढ़े, जया जवादे, वर्षा जोगी, शितल दखने, वर्षा दखने, अनिता दखने, मंदाताई जवादे, नम्रता जोगी यांच्यासह चंद्रपुर घुटकाळा वार्ड, वरवट आणि चोरगांव येथील असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला.

        सदर कार्यक्रमाला मा.बंडूभाऊ हजारे शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख (राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा क्षेत्र), श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख (बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र), सौ .योगिताताई लांडगे महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर, सूर्या अड़बाले युवासेना जिल्हा प्रमुख, कल्पनाताई भुसारी उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, श्री भरतजी गुप्ता महानगरप्रमुख चंद्रपूर, श्री अरविंदजी धिमान वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, सौ मीनालताई आत्राम माजी अध्यक्ष नगरपरिषद भद्रावती, चंद्रपूर शिवसेनेच्या झुंजार नेत्या प्रतिमाताई ठाकूर, वरोरा तालुका प्रमुख श्रीकांतजी खंगार, वरोरा शहर प्रमुख राजेश भाऊ डांगे, सौ मनीषाताई लोणंगाडगे तालुकाप्रमुख महिला आघाडी वरोरा, भद्रावती शहर प्रमुख पप्पू भाऊ सरवण, चेतन घोरपडे उप शहर प्रमुख भद्रावती, मनिष बूच्चे उपशहरप्रमुख, नाना दूर्गे माजी नगरसेवक, भद्रावती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सिंगल दीप पेंदाम, भद्रावती महिला तालुका प्रमुख सौ ज्योतीताई लांडगे, भद्रावती महिला शहर प्रमुख तृप्ती ताई हिरादेवे, उषाताई आमटे, चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे, चंद्रपूर उपतालुकाप्रमुख अविनाश उके, बंडूभाऊ पानपटे, श्री खुशाल सूर्यवंशी शहर प्रमुख राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ( mahawani ) ( shivsena ) ( chandrapur ) ( guru meshram ) ( Suchak dakhane ) ( santosh parkhi )

To Top