०२ नोव्हेंबर २३
राजुरा : काल कंत्राटी कामगार सेने चे संस्थापक तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच शिवसेना राजुरा तालुका प्रमुख मा. सचिन भाऊ गोरे यांच्या नेतृत्वात केले हर्षा कंपनीत कामगाराच्या मागण्या घेत रास्ता रोको आंदोलन. समोर प्रमाणे केल्या होत्या मागण्या कामगारांचा मागील महिन्यातील कामगारांचा पगार दिला गेला नाही तो तात्काळ द्या, कामगारांना दिवाळी बोनस द्या तो त्यांचा अधिकार आहे, HPC नुसार वेतन द्या, वेतन पावती द्या, मागील जून महिन्यात आपण "No Work No Salary" मोहीम बळजबरीने कामगारावर्ती लादली होती ती परत घ्या, प्रत्येक महिन्यात ४ दिवस रजा द्या, कामगारांना वैद्यकीय सुविधा द्या, कामगारांना विमा सुविधा द्या, कामावर येणाऱ्या कामगाराच्या वाहना करीत सुविधा करून द्या, ८ तासाच्या कामात ३० मिंटचा विराम द्या, सदर मागण्या तात्काळ पूर्ण करा अन्यथा संपूर्ण कंपनीचे काम बंद करून दाखवू चांगलाच इंगा असे बोलत आपल्या मागण्या निवेदन व आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्या होत्या.
मागे हि याच मागण्या घेऊन "हर्षा कंपनीला" निवेदन दिले होते परंतु मागील निवेदना वरती कंपनीने कुठलीही प्रतिक्रिया नदिल्याने आणि कामगारांच्या होत असलेल्या गैर सोई, समस्या, त्यांना नमिळत असलेले हक्क, पाहता सचिनभाऊने "रुद्र" रूप धारण केले होते कामगारांचा रोष व आंदोलनाचा धसक्का घेत हर्षा कंपनीने मागण्या केल्या रात्रौच पूर्ण. मागण्या पूर्ण होताच हर्षा कंपनीतील सर्व कामगाराने मानले सचिन भाऊचे आभार. या वेळी शिवसेना शहर प्रमुख, राजुरा राजूभाऊ गद्दाम व मोठ्या संखेने कामगार उपस्थित होते. ( Shiv Sena contract laborer Sen's blow was pressed by "Harsha" company.) ( harsha company ) ( mahawani ) ( sachin gore )