नितीन भाऊ मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे नेतृत्वात माजरी येथील असंख्य महिला व युवकांनी घेतला शिवसेनेत पक्षप्रवेश.महावाणी - विरेन्द्र पुणेकर
०२ नोव्हेंबर २३  

        चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने व माननीय किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार तसेच माननीय दत्तात्रय पैईतवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली माननीय नितीन भाऊ मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी आज श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर, श्री सुंदर सिंह बावरे उपतालुकाप्रमुख भद्रावती, चेतन घोरपडे उपशहरप्रमुख भद्रावती, यांचे समवेत माजरी येथील उप -तालुकाप्रमुख मदन भाऊ चिकवा यांचे निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सहभाग नोंदविला यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी माननीय नितीन मते यांचे कडे महिलांना होत असलेल्या त्रासाबद्दल झंडा दफाई वार्ड क्रमांक 4 व वार्ड क्रमांक 1 मधील समस्यांचा पाढाच वाचला. या परिसरात महिलांना पिण्याच्या पाण्याची जटिल समस्या असून रोडवरती स्ट्रीट लाईटचे सुद्धा समस्या आहे . त्यामुळे पूर्ण परिसरात अंधार पसरलेला असून ग्रामपंचायतने पूर्णपणे या वार्डांकडे दुर्लक्ष केलेले असून कुठलीही सुविधा ग्रामपंचायत व डब्लू सी एल या कर्मचारी व नागरिकांना पुरवत नाही . तसेच मांजरी परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये बाहेरचे कामगार आणून कंपन्या आपले काम निभावून नेत आहे व स्थानिक माजरी वासीयांना कुठेही रोजगार उपलब्ध करून देत नसून त्यामुळे माजरी परिसरातील युवक हे बेरोजगार  आहे या सर्व समस्या नितीन मते यांच्यासमोर मांडल्या असता माननीय नितीन भाऊ मते यांनी या समस्या घेऊन लवकरच एक जण आंदोलन उभारू व या कंपन्यांना वठणीवर आणून माजरी परिसरातील युवकांनाच या कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देवू असा शब्द उपस्थित महिला व युवकांना दिला . त्याचबरोबर माननीय नितीन भाऊ मते यांनी महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका सर्व उपस्थित महिला, युवक व नागरिकांना उपलब्ध करून दिली व आरोग्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी जी मदत दोन लाखावरून पाच लाखावर नेली त्याचे सविस्तर विश्लेषण नागरिकांना समजून सांगितले व मोठ्या आजारांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बारा प्रायव्हेट दवाखाने उपलब्ध असून आपण आधार कार्ड व कुठलेही रगाचे राशन कार्ड घेऊन या योजनांचा लाभ घेऊ शकता याची सविस्तर माहिती उपस्थित जनसमुदायाला दिली . यावेळी अनेक पक्षातील अनेकांनी माननीय नितीन मते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेने मध्ये पक्षप्रवेश केला . यासाठी माननीय मदन भाऊ चिकवा व आशिष ठेंगणे यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी परिसरातील असंख्य नागरिक शिवसैनिक उपस्थित होते.  ( mahawani ) ( chandrapur ) ( warora ) ( majri ) ( nitin matte )

To Top