वनहक्कधारकांचे दावे प्रलंबीत असताना देखील बळजबरीने वृक्षारोपण करणाऱ्या मुजोर वनविभाग अधिकारी व चमुवर कार्यवाही करा #forest department chandrapur

शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या नेतृत्वात सामूहिक वनहक्क संसाधन व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाची निवेदनाद्वारे मागणी महावाणी - विरेंद्र पुणेकर'
०८ नोव्हेंबर २३

    चंद्रपुर : येथील सामूहिक वनहक्क संसाधन व्यवस्थापन समिती वरवट ग्रामसभेला मिळालेल्या 48.41 हैक्टर जमीनीवरील क्षेत्र नियमबाह्य पद्धतिने वृक्षारोपण करुन बाधित करणाऱ्या चंद्रपुर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्राचे (बफर) अधिकारी व कर्मचारी चमुवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा चंद्रपुर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या नेतृत्वात सामूहिक वनहक्क संसाधन व्यवस्थापन समिती, वरवटचे अध्यक्ष सोमेश्वर मड़ावी, सचिव नारायण जुमड़े, कोषाध्यक्ष सौ. लता दिलीप मरस्कोल्हे, किशोर खोब्रागडे, घनश्याम डाखरे, गुरुदास मेश्राम, दत्तात्रय कावळे, विश्वास खैरे व पत्रुजी भोयर यांनी चंद्रपुर वनवृत मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

    सविस्तर वृत असे की, वरवट सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीला 173.41 हेक्टर वन जमीन अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना वनहक्काची मान्य करणे  अधिनियम 2006, 2008 व सुधारणा नियम, 2012 अन्वये मिळालेली असता ग्रामसभेनी सामूहिक वनहक्क वनव्यवस्थापन समितीची दि. 02 मे 2022 निर्मिती करण्यात आली.

    चंद्रपुर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्राधिकारी (बफर) यांनी सामूहिक वनहक्क वनव्यवस्थापन समिती किंवा ग्रामसभेला कोणतेही पत्र व परवानगी न घेता दि. 04 जुन 2022 व 05 जुन 2022 ला TMC, JCB व ट्रैक्टर लावून खड्डे  खोदल्यामुळे ग्रामसभेनी सदर बाब जिल्हाधिकारी यांना दि 06 जुन 2022 ला निदर्शात आणून दिल्याने दि. 08 जुन 2022 आदेश देवून तात्काळ थांबवित आले.

    परंतु चंद्रपुर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्राधिकारी (बफर) महेशकर मॅडम व त्यांचा चमुने आदेशाची पायमल्ली करुन दि. 28 व 29 जुन 2023 ला मुजोरी करुन वृक्षारोपणाचे काम सुरुच ठेवले. त्यामुळे यासंबंधात दि. 30 जुन 2023 ला उपविभागीय अधिकारी यांना तक्रार करण्यात आली असता दि.13 जुलै 2023 च्या लेखी निर्णयात 52 वैयक्तिक वनहक्कधारकांचे अतिक्रमण दावे प्रलंबीत असताना बळजबरीने वनविभागाने केलेली कार्यवाही कलम 4(5) अन्यवे कायदयाचे उलंघन केल्याचे स्पष्ट केले.

    जेव्हा की, जिल्हाधिकारी यांचे आदेश क्र. 4754 दि. 28 जानेवारी 2022 प्रमाणे मिळालेल्या सामूहिक दाव्यातील जवळपास 48.51 हेक्टर जमीन वनविभागाच्या वृक्षारोपणामुळे बाधित झाली. त्याचप्रमाणे वनहक्क अधिनियम 2006, 2008 व सुधारणा नियम 2012 अन्यवे शासन निर्णय वहका-2014/ प्र. क्र.66 का 14 नुसार गठित केलेल्या समितीचे अधिकार व कर्त्यव्य हनन वनविभागामार्फत करण्यात आले.

    त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे 52 वैयक्तिक वनहक्कधारकांचे अतिक्रमण दावे प्रलंबीत असताना व जिल्हाधिकारी यांनी वारंवर लेखी आदेश देवून देखील वनपरिक्षेत्राधिकारी (बफर) महेशकर मॅडम व त्यांचा चमुने आदेशाची पायमल्ली करुन बळजबरीने वृक्षारोपण करुन कायदयाचे उलंघन केल्यामुळे संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

( forest department chandrapur ) ( mahawani )( santosh Parkhi )

To Top