शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अचानक पाहणीमुळे वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी आले गोत्यात!महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ नोव्हेंबर २३

        चंद्रपुर : येथील दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Durgapur Primary Health Centre ) राहण्यासाठी वसाहत असताना देखील डॉक्टर व स्टॉप मुख्यालयी राहत नसल्यामुळे दि. 12 नोव्हेबर 2023 ला रात्री 2 वा. च्या सुमारास सुकन्या संदीप देठेकर ( sukanya sandip dethekar ) नामक महिलेची डिलीवरी नर्सच्या तत्परतेने वेळेवर आलेल्या डॉक्टरच्या सहाय्याने डिलीवरी सुरळीत पार पडली, ही माहिती मिळताच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी ( santosh parkhi ), तालुका संघटक संजयकुमार शिंदे ( sanjay shinde )  व राजू रायपुरे अचानक भेट दिल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी गोंधळून गेल्याचे निदर्शात आले.

    दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वात मोठे व प्रथम क्रमांक प्राप्त आरोग्य केंद्र असून याठिकाणी डॉक्टर व कार्यालयीन स्टॉपकरीता राहण्यासाठी वसाहत असताना देखील डॉक्टर व स्टॉप मुख्यालयी राहत नसल्यामुळे आपातकालीन स्थितीत व डिलीवरीला येणाऱ्या महिलांना जीव मुठित घेवून दाखल व्हावे लागत आहे.

    त्याचप्रमाणे मनुष्यबळ कमी असल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सेसवर कामाचा व्याप वाढवून काही नर्सला 12-12 तास कामे करावी लागत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास स्टाप उपलब्ध ठेवणे, डॉक्टर व कर्मचारी यांनी नियमित आपले ओळखपत्र कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असताना देखील कुणीही पालन करत नव्हते.

    सदर प्रकरणाची पाहणी करताना चंद्रपुर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. पड़गीलवार ( dr. padgilwar ) हे सुद्धा याच संदर्भात आल्याने सदर बाबींचा संपूर्ण अहवाल तयार करुन वरिष्ठ अधिकारी यांना निदर्शनात आणून देण्यात यावी व याची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला शिवसेना पद्धतीने सदर प्रकरण हाताळावे लागेल अशा इशारा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, तालुका संघटक संजयकुमार शिंदे व राजू रायपुरे यांनी दिला.

To Top