शिवसेना संपर्क प्रमुख मा. दत्तात्रयजी पईतवार यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रासंदर्भात दौरा
महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ नोव्हेंबर २३

        चंद्रपुर : येथील चंद्रपूर, वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्राचे शिवसेना चंद्रपुर संपर्क प्रमुख मा. दत्तात्रय पैईतवार ( Dattatraya Paiitawar )साहेब यांचा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्राच्या समस्यासंदर्भात मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख, किरणभाऊ पांडव यांचे सूचनेनुसार दिनांक 18 नोव्हेबर ते 20 नोव्हेबर पर्यंत दौरा आयोजित करण्यात आला आहे.

    शिवसेना पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा विधानसभा क्षेत्राच्या पक्ष बांधणी व वाढीसाठी नियोजन करण्याबाबत तसेच शिवसैनिकांना बळ देण्याचे कार्य करण्यासाठी माननीय दत्तात्रय पैईतवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा होत आहे. या दौऱ्यामध्ये तीनही विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना, युवासेना, महीला आघाडी चे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहर प्रमुख, शिवदूत, बूथ प्रतिनिधी व शाखाप्रमुख यांच्याशी संवाद साधून पक्ष वाढीसाठी काय काय उपाययोजना करता येईल, याची संपूर्ण माहिती घेवून त्याबाबत सविस्तर अहवाल शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब व वरिष्ठांना देवून चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासंदर्भात चंद्रपुरच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी तशा सूचना विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष ठेंगणे यांनी कळविले आहे. ( chandrapur ) ( mahawani )

To Top