दिवाळीच्या सणात गोरगरीब ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करू नये. शिवसेनेचा इशारामहावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ नोव्हेंबर २३

         चंद्रपुर : येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपुर, मुल, पोंभूर्णा व चंद्रपुर तालुक्यातील गोरगरीब ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत
न करता, मोल मजूरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ येणार नाही. याची खबरदारी घेण्याचा इशारा शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. नितिनभाऊ मत्ते ( nitin matte ) यांच्या सूचनेनुसार व उपजिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला यांचे नेतृत्वात तसेच चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी ( santosh parkhi ),  तालुका संघटक संजयकुमार शिंदे, राजू रायपुरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. 

    महावितरण कंपनीच्या वतीने ऐंन सणासुदीत गोरगरीब जनतेला विज थकबाकी असल्यामुळे ग्राहकांनी विज बिल तात्काळ भरणा करण्यात येण्यासंदर्भात वसूली अभियान सुरु असल्याचे सांगून मानसिक त्रास देऊन थकीत बिल भरण्यास भाग पाडल्या जाते. जेव्हा की, मोठ मोठ्या व्यावसायीकांना, धनदांडग्याना व व्यापारी ग्राहकांना विज बिलाचा भरणा करण्यास अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून विशेष सवलत देऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.

    नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ( devendra fhadanvis ) यांनी शेतकर्यांना २४ तास वीज देण्याचे आश्वासन देले आहे व दिवाळी सना करिता  महाराष्ट्र शासनाकडून आनंदाच्या शीदा ( anandachya shida ) दिल्या जात आहे. ज्याने गोर गरीब नागरिक आनंदात दिसून येत आहे परंतु महावितरणच्या या वीज खंडन मोहिमे मुळे नागरिक चिंतीत दिसून येत आहे दिवाळीच्या पर्वावर वीज पुरवठा खंडित झाल्याने दिवाळी अंधारात साजरी करावी का असे प्रश्न नागरीकातून विचारले जात आहे. त्यामुळे बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपुर, मुल, पोंभूर्णा व चंद्रपुर तालुक्यातील गोरगरीब ग्राहकांचा विज पुरवठा दिवाळी सारख्या सणात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडून खंडीत करण्यात येऊ नये, अशा इशारा शिवसेनेचे चंद्रपुर उपजिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, तालुका संघटक संजयकुमार शिंदे, राजू रायपुरे यांनी अभियंता यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन देण्यात आला.  ( Do not interrupt the electricity supply of poor customers during the festival of Diwali... Shiv Sena's warning ) ( mahawani ) ( chandrapur ) ( mahavitaran )

To Top